भुसावळ । शहर व तालुक्यात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मराठा समाजातर्फे 19 फेब्रुवारीला शासकीय तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती मराठा समाजाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पाटील यांनी शहरात प्रथमच भव्य स्वाभिमान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
या मार्गाने काढण्यात येणार रॅली
या रॅलीचा प्रारंभ 19 रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी नगर येथून प्रतिमा पूजन करुन रॅलीची सुरुवात होणार आहे. आंबेडकर पुतळा, बस स्टॅण्ड, अमर स्टोअर्स, गांधी चौक, मरिमाता मंदिर, नृसिंह मंदिर, वाल्मिक चौक, या मार्गे दुपारी 12.30 वाजता रॅलीचा युनियन बँके समोर समारोप होणार आहे. रॅलीत चित्ररथ ढोलपथक, झांज पथक, लहान मुलांचा आखाडा, बेटी बचाव प्रबोधन, लेझीम पथक, सजीव देखावा, ढोल ताशा पथक राहतील. पत्रकार परिषदेला समिती अध्यक्ष महेंद्र पाटील, उपाध्यक्ष अशोक पाटील, नरेश पाटील, बापू पाटील, संजय कदम, महेंद्र ठाकरे, गौरव आवटे आदी उपस्थित होते.
पोवाड्याचा कार्यक्रम
तसेच 18 रोजी शिवशाहीर शिवाजीराव पाटील यांचा टिंबर मार्केट येथे सायंकाळी 7 वाजता पोवाडा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच समारोप प्रसंगी विशेष सरकारी वकिल उज्वल निकम, बालरोग तज्ञ डॉ. राजेश पाटील, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, आयुध निर्माणीचे सहव्यवस्थापक टी.बी. देशमुख, दिपनगर मुख्य अभियंता अभर हरणे तसेच सामाजिक कार्यकर्त्या गौरी थोरात आदी उपस्थित राहतील.