शहरात सहावे डॉ. आंबेडकर विचार संमेलन 24 सप्टेंबरला

0

जळगाव । महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, जिल्हा महिला असोसिएशन आणि पुरागामी समविचारी संघटनेच्यावतीने 24 सप्टेबंर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान शहरातील कांताई सभागृहात 6 व्या डॉ़बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटक पुणे येथील प्रा़ डॉ़ अंजली मायादेव आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सत्रात त्यांचे बीज भाषण होणार आहे़ तर, राज्यातील ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा़ पुष्पा भावे यांचे समारोपााच्या सत्रात भाषण होणार असल्याची माहिती या सहाव्या डॉ. आंबेडकर विचार संमेलनाचे स्वागताध्यक्ष साजीद शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली़ याप्रसंगी डॉ. आंबेडकर विचार संमेलनाचे प्रमुख संयोजक मुकूंद सपकाळे, जिल्हा महिला असोशिएशनच्या वासंती दिघे, राजकमल पाटील, अशफाक पिंजारी, डिगंबर कट्यारे, फईम पटेल, डॉ़शरीफ शेख सुधाकर पाटील आदी उपस्थित होते़

साजीद शेख यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य प्रगतीशिल लेखक संघ, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती आणि पुरोगामी समविचारी संघटनाच्या संयुक्तविद्यमाने 10 संमेलनांचे आयोजन करण्यात आले असून यापैकी पाच संमेलने (नागपूर, नाशिक, पुणे, भोर, नांदेड) घेण्यात आली व सहावे संमेलन जळगावात घेण्यात येत असून यातून वैचारी प्रबोधन व भारतीय संविधान साक्षरता अभियान राबवून जनजागृती करण्यात येणार आहे़ ह्या सहाव्या समेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ’महिला विचार सुत्र’ आहे़ संमेलन चार सत्रात होत असून यात अ़भा़म़साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ़ श्रीपाद जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे पहिल्या सत्रात ’हिंदू कोड बील आणि डॉ़ आंबेडकर’ या विषयावर श्रुती तांबे विचार मांडतील तर दुसर्‍या सत्रात ’अल्पसंख्याक महिला आणि भारतीय संविधान’ या विषयावर विचारवंत डॉ़ रजीया पटेल मार्गदर्शन करतील़ तसेच भारतीय महिलांची वर्तमान परिस्थिती याविषयी डॉ़ भारती पाटील विशेषत्वाने आपले विचार मांडणार आहेत़ तसेच ’जागतिकीकरणाचे महिलांवरील परिणाम’ यावर प्रा़ विनया मालती हरी हे विचार व्यक्त मांडतील़ त्याच प्रमाणे समारोप सत्रात कॉ़ डॉ़ भालचंद्र कांगो मार्गदर्शन करणार आहेत़