भुसावळ । पवित्र श्रावण महिना सुरू असलातरी शहरात मात्र उघड्यावर होणार्या मांस विक्रीमुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत असल्याने प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा शिवसेना तालुका प्रमुखांसह पदाधिकार्यांनी केली आहे. शनिवारी या संदर्भात प्रांताधिकारी प्रशासनास निवेदनही देण्यात आले.
नागरिकांच्या भावना दुखावल्या
निवेदनाचा आशय असा की, शहरात मोठ्या प्रमाणावर उघड्यावर मांस विक्री सुरू असल्याने शिवाय पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
शिवसेनेतर्फे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आलेल्या निवेदनावर तालुकाप्रमुख समाधान महाजन, अॅड.श्याम श्रीगोंदेकर, प्राचार्य विनोद गायकवाड, हिरामण पाटील, नीलेश महाजन, देवेंद्र पाटील, बबलू बर्हाटे, मिलिंद कापडे, प्रा.धीरज पाटील, भूषण भोळे, निखील बर्हाटे, अथर्व जोशी, सचिन चौधरी, राकेश खरारे, अरुण साळुंके यांच्या स्वाक्षर्या आहेत.
घाणीचे साम्राज्य
एकीकडे शासन स्वच्छतेते धडे देत असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहर व परिसरात अस्वच्छतेेचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. त्यात उघड्यावर मांस विक्रीमुळे दुर्गंधी पसरुन अच्छतेमुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. तरी उघड्यावरील मांस विक्री लवकरात लवकर बंद करुन नियोजनात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविली जाणार आहे. त्यात भेदभाव न करता सरसकट सर्वांची अतिक्रमण काढण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.