पिंपरी-चिंचवड : शहरात मंगळवारी विविध संघटनांच्यावतीने मोठ्या उत्साहात 71 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले. यात ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तिंचा सत्कार, वृक्षारोपण, रक्तदान आदीचा समावेश होता.
नेहरुनगर : अखिल भारतीय मराठा महासंघ शहर कार्यालयातर्फे ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर कंद व राजाराम घाडगे यांनी ध्वज पूजन केले. माजी सैनिक भास्कर गायकवाड यांच्या हस्ते ध्वजरोहन झाले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष नितीन समगीर, शिवसेनेचे शरद हुले, चंन्द्रशेखर कणसे, निगडी-चर्होली चे भाजपाचे मंडल अध्यक्ष अजय पाताडे, भाजपाचे शिक्षक आघाडीचे दत्तात्रय यादव, नेहरुनगर शिवसेना विभाग प्रमुख एकनाथ कदम, सामाजीक कार्यकर्ते सुभाष जाधव, संजय देशमुख, बबलू सय्यद, रामदास नेरकर उपस्थित होते.
पिंपळे गुरव : देवकर पथ येथील एम.जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलीयंट स्टार प्रे स्कूलमध्ये नगरसेविका माधवी राजापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. यावेळी संस्थेच्या संस्थापिका शांताबाई देवकर व सरस्वती देवकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, उद्योजक बबनराव देवकर, रामदास देवकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माधुरी वांद्रे यांनी केले, तर मुख्याध्यापिका वंदना देवकर यांनी आभार मानले. यावेळी दहीहंडीही साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका वंदना देवकर यांनी उत्सवाचे महत्व सांगितले.
वाकड : कस्पटेवस्तीमधील विंडवडस् सोसायटीने स्वातंत्र्यदिनानिमित्त दुष्काळ ग्रस्ताना मदत केली. सोसायटीने जमा झालेला निधी तेज ज्ञान फाउंडेशनच्या पदाधिकारी कविता कानडे, मंगला बेलोकर, मनीषा कानडे यांच्याकडे सुपूर्द केला. इथूनपुढे अनेक विविध प्रकारची मदत दुष्काळग्रस्तांना करणार असल्याची घोषणा सोसायटीचे चेअरमन रुपेश देशपांडे यांनी केली. यावेळी नगरसेवक संदीप कस्पटे, रामदास कस्पटे, डॉ. वसंत इंगळे, मोहसिन मनसुरी, कुणाल ठाकुर, लिना माहेश्वरी, रुपा कोंगवाड आदी उपस्थित होते.