जळगाव । अखंड सौभाग्याचे वरदान मिळावे, यासाठी सुवासिनींनी मोठ्या उत्साहात हरतालिकेची पूजा केली. शहरातील ओंकारेश्वर, तसेच चिमुकले राममंदिर तसेच शिवधाम महादेवाची मंदिरे शुक्रवारी सकाळपासून गजबजलेली दिसत होती.
पतीला दीर्घायुष्य मिळावे, तसेच कौटुंबिक चिंता दूर व्हाव्यात, अशी प्रार्थना करत भक्तीभावाने हे व्रत पूर्ण करण्यात आले.रात्री उशिरा महादेवाच्या आरत्या, देवाचे गाणे गाऊन सुवासिनी हरतालिका साजरी केली.