शहरात होणार दोन दिवसाआड पाणीपुरवठा

0

जळगाव– वाघुर धरणातून जळगाव शहराला पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात पाणीसाठा कमी असल्यामुळे मनपा प्रशासनाने नियोजित दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसाआड केला होता. मात्र आता धरणात 85 टक्के पाणीसाठा असल्यामुळे पुन्हा दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा यासाठी महापौर सीमा भोळे यांनी आयुक्तांना काही दिवसापूर्वी पत्र देवून मागणी केली होती. त्यानुसार दि. 3 आक्टोबरपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिली.

गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यानेे जळगावकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.उन्हाळ्यात वाघूर धरणात केवळ 25 ते 30 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले होते.परिणामी शहरातील दोन दिवस होणारा पाणी पुरवठा तीन दिवसाआड करण्यात आला आहे. मात्र यंदा समाधानकारक पाऊस झाला असून 85 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. परतीच्या पावसात वाघूर धरण पुर्ण भरण्याची अपेक्षित असल्याने दि.3 आक्टोबरपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.