शहरात २५० अतिक्रमणावर हातोडा

 

जळगाव : जळगाव शहर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोठी कारवाई केली असून दिवसभरात शहरातून एकुण २५० अतिक्रमणे काढण्यात आली. शहरातील ईच्छा देवी चौक ते डीमार्ट रस्त्याला जोडणारा तांबापूरा परिसरातील महादेव मंदिरापर्यंतच्या रस्त्यांवरील अतिक्रमण मंगळवारी महापालिकेच्या पथकाकडून काढण्यात आले. त्यानंतर पांडे डेअरी चौक ते नेरी नाकापर्यंतच्या अतिक्रमणावर देखील हातोडा चालविण्यात आला

 

तांबापुरा परिसरातील महादेव मंदिरापर्यंतचा रस्ता १८ मीटर असून त्यापैकी सध्यास्थितीला ६ मीटर रस्त्या सध्यास्थितीत शिल्लक होता. त्यामुळे नगररचना विभागाकडून ९ मीटर रस्ता मोकळा करण्यासाठी अतिक्रमण विभागाला मार्किंग करुन देण्यात आली होती. त्यानुसार ३ मीटर अतिक्रमण मनपाच्या पथकाकडून काढण्यात आले. आता नगररचना विभागाकडून पुन्हा नव्याने मार्किंग करण्यात आली असून एकुण १८ मीटर रस्ता मोकळा करण्यात यावा, अशा सुचना देण्यात आल्या आहेत याच बरोबर च्छा देवी चौकापासून ते डी-मार्टपर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूंचे अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून काढण्यात आले. डाव्याबाजूचे ११ फुट व उजव्या बाजूचे ११ फुटापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले असतांना आता नगररचना विभागाकडून नवीन मार्किंग करण्यात येवून २४ फुटापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात यावे, अशा सुचना करण्यात आल्या आहेत.