शहरात 12 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे पारितोषिक वितरण

0

जळगाव । मणियार विधी महाविद्यालय आयोजित डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे स्मृती 12व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रमुख पाहुणे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे न्यायमूर्ती ए.एम. ठिपसे यांच्याहस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आयएलएस लॉ कॉलेज, पुणेच्या संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघास डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे फिरता चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कमेचे पारितोषिक देण्यात आले. द्वितीय कमांकाचे फिरते चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कमेचे पारितोषिक ठाणे येथील व्हीपीएमचे टीएमसी लॉ कॉलेजच्या संघाने प्राप्त केले. आयएलएस लॉ कॉलेज, पुणेच्या कु. दिशा सुरप्रिया आणि नांदेड येथील नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजच्या हैदेरी फातीमा लियाकत अली यांना उत्कृष्ट विद्यार्थिनी वकील साठीचे चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कमेचे पारितोषिक विभागून देण्यात आले. तसेच जितेंद्र चव्हाण कॉलेज ऑफ लॉ मुंबईच्या कंदर्प कनक त्रिवेदी यास उत्कृष्ट विद्यार्थी वकील साठीचे चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कमेचे पारितोषिक बहाल करण्यात आले.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत: यावेळी जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री एम.ए. लोवेकर यांची सन्माननीय उपस्थिती लाभली़ के.सी.ई. सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील, महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सीलचे माजी सदस्य अ‍ॅड. विपीन बेंडाळे, जळगाव जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.एल.व्ही. वाणी, के.सी.ई. सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अ‍ॅड. सुनील डी. चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी हे होते. कार्यकमाचे अध्यक्षस्थानी सचिव अ‍ॅड.एस.एस. फालक यांनी भूषविले.

यांची होती उपस्थिती: न्या. के.पी. नांदेडकर, न्या. ए.के. पटनी, न्या. श्रीमती दरेकर, न्या घोरपडे, न्या. कुलकर्णी, न्या. ठोंबरे, न्या. मीश्रा, न्या. पाटील, न्या. ठाकूर, न्या. गोरे, न्या. श्रीमती चौधरी, न्या. खेडकर, न्या श्रीमती भळगट, न्या. हक, न्या. साठे, अ‍ॅड. प्रमोद पाटील, अ‍ॅड. मुजुमदार, अ‍ॅड. सुरज जहांगीर, अ‍ॅड. मुंदडा, अ‍ॅड. स्वाती निकम, अ‍ॅड. श्रीमती भोकरीकर, प्रा. डी.आर. क्षीरसागर, प्रा. रेखा पाहुजा, प्रा. जी.व्ही. धुमाळे, प्रा. योगेश महाजन, कोर्ट समन्वयक डॉ. विजेता सिंग, प्रा. अंजली बोंदर उपस्थित होते.