शहरात 18 खासगी शाळा अनधिकृत

0

पाल्यांसाठी शाळांमध्ये प्रवेश देताना खबरदारी घ्याी
शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांची माहिती
पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरीतील 18 खासगी शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. त्या शाळांची यादी महापालिकेने यापुर्वीच जाहीर केलेली आहे. त्यामध्ये 17 शाळा इंग्लिश माध्यमाच्या तर एक शाळा मराठी माध्यमाची आहे. त्या शाळांमध्ये पालकांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

नोटींसकडे दुर्लक्ष
शहरामध्ये काही खासगी प्राथमिक शाळा बिनदिक्कतपणे सुरू आहेत. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळांनी राजरोसपणे धंदा मांडला आहे. या अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी त्या संबंधित शाळेच्या संस्थांना दरवर्षी नोटीसही बजावल्या जात आहेत. मात्र या नोटिशीकडे दुर्लक्ष करत या शाळा अनधिकृतरीत्या सुरु आहेत. महापालिकेच्या हद्दीत तब्बल एकूण 18 शाळा अनधिकृतपणे चालविल्या जात आहेत. पालकांकडून या शाळा वारेमाप फी गोळा करुन त्यांची फसवणूक शाळेकडून होत आहे. संबंधित शाळांना नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पर्यवेक्षकांना दिलेले आहेत. शहरातील या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणार्‍या नुकसानीस महापालिका शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असेही गव्हाणे यांनी स्पष्ट केले आहे.

एक लाख दंड होणार
दरम्यान, अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास पाल्याच्या होणार्‍या शैक्षणिक नुकसानीस स्वताः पालक जबाबदार राहतील, तसेच संबंधित शाळांना सुरुवातील नोटीस देवून त्यांच्यावर एक लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, त्यानंतरही शाळा सुरु राहिल्यास संबंधिताना दरदिवशी 10 हजार रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित अनधिकृत शाळांवर 19 आक्टोबर 2010 च्या कायद्यानुसार कारवाईचा इशारा प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिला आहे.

अनधिकृत शाळांची नावे
ग्रँड मीरा इंग्लिश स्कूल (मोशी), स्मार्ट स्कूल (मोशी प्राधिकरण), इंद्रायणी इंग्लिश मीडिअम स्कूल (साई पार्क दिघी), बुद्धिस्ट इंटरनॅशनल इंग्लिश मीडिअम स्कूल (मोशी), मास्टर केअर इंग्लिश मीडिअम स्कूल (भोसरी आळंदी रोड), ग्रँड मीरा इंग्लिश, मीडिअम स्कूल (चिखली), जयश्री इंग्लिश मीडिअम स्कूल (चजहोली), मरिअम इंग्लिश मीडिअम स्कूल (भोसरी), पर्ल ड्रॉप स्कूल (पिंपळे निलख), ज्ञानराज प्राथमिक स्कूल (कासारवाडी), सेंट मेरीज् ज्युनिअर प्रायमरी स्कूल (पिंपळे निलख), माउंट कारमल पब्लिक स्कूल (सांगवी), शुभंकरोती इंटरनॅशनल स्कूल (गांधी पेठ,चिंचवड), एंजल्स प्राथमिक स्कूल (पिंपळे निलख), मॉडर्न पब्लिक स्कूल (रहाटणी), ब्लू रोज इंटरनॅशनल स्कूल (चिंचवड), बालगोपाल माध्यमिक शाळा (मराठी माध्यम,पिंपरी)