जळगाव । मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने फुल मार्केट येथे 50 मॅक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या अंदाजे 750 ते 800 किलो वजनाच्या प्लास्टीक पिशव्या जप्तीची कारवाई केली. जप्तीची कारवाईत आरोग्य अधिकारी उदय पाटील, शरद बडगुजर, अशोक नेमाडे, संजय अत्तरदे, राकेश कांबळे, दिनेश गोयर, के. के.बडगुजर यांनी सहभाग घेतला. फुले मार्केटच्या एल पट्ट्यातील दुकान नं. 41 शिवम प्लास्टीक हे सुरेश तलरेजा यांच्या दुकानांत ही कारवाई करण्यात आली. यात लहान मोठ्या 62 गोण्या अंदाजीत 75 हजार रूपयांचा माल जप्त करून 10 हजारांचा दंड करण्यात आला आहे.