शिरूर । शिरूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी पल्लवी अमोल शहा यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
खासदार सुप्रिया सुळे, शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार, शिरूरचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे, घोडगंगाचे संचालक दिलीप मोकाशी, जिल्हा संघटक अमोल चव्हाण आणि महिला पदाधिकार्यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी शहा यांना शहराध्यक्षपदी निवड झाल्याबाबतचे पत्र दिले. रूपाली चोपडे, तृप्ती लामखेडे, संगिता रोकडे, मनोरमा जांभळे, जयश्री उगले, मंजुषा बकाल, मुमताज शेख, सविता औटी, सुवर्णा शहा आदींसह महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.