पिंपरी-चिंचवड : एखाद्या ब्रँडचे ओपनींग व्हावे तसे एखाद्या टोळीचे ओपनींग होत असेल तर हा समाजाला व पोलीस प्रशासनालाही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पिंपरी-चिंचवड येथे झालेले टोळी युद्ध ताजेच असताना पुणे ग्रामीण भागातही हो लोण सध्या चांगलेच फोफावताना दिसत आहे. या टोळीचे 31 डिसेंबर रोजी सोशल मिडीयो वरुन चांगलेच ग्रँड ओपनींग झाले.
सात दिवसांत तीन हल्ले, एक खून
मावळ भाग हा अत्तापर्यंत मावळ्यांचा व संताचा भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र आता तो गुन्हेगांराना लपवण्याचा व टोळी जोपण्यासाठी पोशक मानला जातो. देहूरोड येथे 31 डिसेंबर ते 6 जानेवारी या सात दिवसाच्या काळात तीन जिवघेणे हल्ले व एक खून झाला आहे. यामध्ये भरदिवसा बाजारपेठेत एकावर वार केले एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला तर शनिवारी (दि. 6) रात्री घराजवळ जेवून फिरत असताना आरिफ शेख (वय 49, रा. विकासनगर, देहुरोड) यांच्या डोक्यात दगड घोलून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. या घटना ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी दाखवण्यासाठी पुरेशा आहेत.
यमराज टोळी
त्यात 31 डिसेंबरच्या रात्री यमराज या टोळीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून ग्रँड ओपनींग केले. ज्यामध्ये त्यांनी महाराज आजपासून तुम्ही फक्त आराम करा बाकी मी बघतो, तसेच एकच गोळी यमराज टोळी अशी जाहीरातही त्यांनी सर्वत्र केली आहे. त्यामुळे फेसबूक व व्हॉटसअॅप हे या टोळ्यांसाठी मोफत व पटकन पसरणारे माध्यम झाले आहे.
रावण, महाकाली टोळी
पिंपरी-चिंचवड मध्ये झालेल्या रावण व महाकाली टोळक्यानेही सोशल मिडीयाचा पुरेपुर वापर केला होता जिथे त्यांनी उघड-उघड धमक्याही दिल्या होत्या. त्यातूनच पुढे रावण टोळीच्या म्होरक्याचा खून झाला. अर्थात पोलिसांनी पुढे कारवाई कर गुन्हेगारांना अटक केले. मात्र शहरात गुन्हे करायचे व ग्रामीण भागात लपून बसायचे, असे चित्र आत्तापर्यंत होते. मात्र आता ग्रामीण भागातच टोळी निर्माण होण्यास सुरुवात झाली ज्यामध्ये तरुण व अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
गुन्हे घडत आहेत हे मान्य असले तरी पोलीसही तशी कारवाई करत आहेत. आम्ही दोन टोळ्यांनाही नुकताच मोका लावला. यामध्ये दांगट टोळीसारख्या कुख्यात टोळीतील गुन्हेगरांचा समावेश आहे. त्याप्रमाणे यापुढेही अशा टोळ्या उदयास येत असतील तर वेळीच कठोर कारवाई करुन त्यांनाही रोखण्यात येईल. यासाठी आम्ही सोशल मिडीयावरही नजर ठेऊन आहोत.
-गणपतराव माडगुळर, देहुरोड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी