शहरामधील 75 पैकी 34 दारु दुकाने बंद

0

जळगाव। न्यायालयाने महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत असलेल्या परमिट रुम बियरबार, वाइन शॉप, देशी दारुचे दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत जळगाव शहरातील महामार्गालगतचे दुकाने बंद करण्यात आले आहे. शहरातील तसेच महामार्गाला लागुन असलेल्या 75 पैकी 35 दारु दुकाने बंद करण्यात आले आहे. हद्दीबाहेरील तुरळक प्रमाणात दारूची दुकाने उघडी ठेवण्यात आली होती. महामार्गावरील दारूची दुकाने बंद असल्याने शहरातील वाइन शॉपवर तळीरामांची गर्दी वाढली होती.

उत्पादन शुल्क विभागाने महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत असलेल्या दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही. त्यांना नोटिसा बजावून मद्यसाठ्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले.

कंजरवाड्यात दारू विक्री होते मोठ्या प्रमाणावर
मद्यसाठा जप्त करण्याचाही इशारा दिला होता. कंजरवाड्यातील दारु विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात दारु खरेदी केली. दारुचे दुकाने बंद झाल्यामुळे तळीरामांची पंचाईत झाली. कंजरवाड्यातील दारूविक्रेत्यांनी शहरातून मोठ्या प्रमाणात दारू खरेदी केली. तसेच परमिट रूम, दारू दुकानमालक, वाइन शॉप मालकांनी दुपारी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांची भेट घेऊन निवेदनही दिले.