जळगाव: गेल्या आठवड्याभरापासून संततधार पाऊस सुरूच आहे. दरम्यान आज दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील लेंडीनाला भागातील वाहतूक ठप्प झाली होती. जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. सकाळपासून हलक्या सरी सुरु होत्या. मात्र दुपारून जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची भंबेरी उडाली.
दरम्यान आमदार सुरेश भोळे यांनी पावसानंतर जळगाव शहरातील परिसराची पाहणी केली. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबले आहे ते मोकळे करण्याचे काम सुरु आहे.