कोल्हापूर पूरपरिस्थितीमुळे फुलांचे दर गडगडले ः फुलांची आवक घटली, भाव वाढले दुपटीने ; घटस्थापनेनंतर वाढेल फुलांची आवक
जळगाव : (अतुल कोठावदे ) – गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पूरपरिस्थिती मुळे तेथील शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील फुलशेतीचेही मोठ्या नुकसान झाल्यामुळेफुलांच्या आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. फुलांची आयात कमी होत असल्याने फुलांचे दर कडाडले आहेत. या दरवाढीचा गणेशोत्सव गणेश भक्तांवर या कुठलाही परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे.
पूरग्रस्त भागात मागणी वाढल्याचा परिणाम
जळगाव शहरात पुणे, नाशिक, मुंबई येथून मोठ्या प्रमाणात फुलांची आयात केली जाते. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे या भागात फुलांची गणेशोत्सव काळात फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. तसेच या भागात फुलांची आयात करणे सोपे असल्यामुळे मुंबई, पुणे येथील फुल व्यापारी या भागात निर्यात करत असल्यामुळे दुसरीकडे फूलांचा कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने जळगाव, सह दुसर्या जिल्ह्यात फुलांची आवक निम्म्यावर झाली असल्याने भाव वाढ झाली असल्याचे चित्र आहे.
भाववाढीचा परिणाम भाविकांवर शून्य
गेल्या वर्षापेक्षा या वर्षी फुलांच्या भावात वाढ दुपटीने झाली आहे. भाव वाढीचा परिणाम गणेश भक्तांवर झाला नसून, या काळात मागणी वाढली असल्याचे फुल विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. तसेच गौरी गणपतीचे आगमन झाल्याने उलट मागणी जास्त व आवक कमी अशी स्थिती आहे. गणेशोत्स असल्याने घरगुती गणपती सार्वजनिक छोट्या- मोठे मंडळाकडून मागणी होत आहे. लहान हार 30 रुपया पासून, 100 रुपयापर्यंत आहे, तर मोठे हार 150 रुपये ते 700 रुपयापर्यंत उपलब्ध आहे.
असे आहे फुलांचे भाव
गेल्यावर्षी याच फुलांचे भाव कमी होते. त्यात दुपटीने वाढ झाली आहे. यात झेंडू 140 ते 160 रु. किलो, निशिगंध 800 रु. किलो, शेवंती 300 रु. किलो, गुलाब 600 रु. शेकडा, 150 रु. जरबेरा, 250 रु. डच गुलाब अशा पध्दतीने विकला जात आहे. गणेशोत्सव काळात शहरात झेंडूच्या फुलांची आवक 10 ते 15 क्विंटल, तसेच शेवंती 4 ते 5 क्विंटल या प्रमाणात होत आहे.
कोट
राज्यातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने, शहरात फुलांच्या आयातीवर परिणाम झाला आहे. मागणी वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालि आहे. फुलांची आवक घटस्थापनेनंतर वाढणार असून, तेव्हा दर काय राहतील हे आत्ताच सांगता येणार नाही. – लोकेश भोई, फुल विक्रेते.