शहरासह जिल्ह्यात ‘वोडाफोन – आयडिया’ कंपनीच्या सेवेचा खोळंबा

0

जळगाव– शहरासह जिल्ह्यातील सर्वत्र वोडाफोन-आयडिया कंपनीच्या सेवेचा खोळंबा झाला असून कंपनीचे सीमकार्ड तसेच फोन वापरकर्त्या ग्राहकांना एक अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वोडाफोन-आयडिया कंपनीचे मोबाईलमध्ये सकाळपासून नेटवर्क नाही, तसेच इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. पुण्यात झालेल्या अतिपावसामुळे तांत्रिक अडचणी झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले असून सायंकाळी 4 वाजेनंतर सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दि. 15 रोजी सकाळपासून वोफाफोन-आयडिया या मोबाईल नेटवर्क कंपनीचही सेवा सर्वत्र ठप्प झालेली आहे. मोबाईल इन्कमिंग आऊटगोईंग कॉल्ससह इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. ग्राहकांनी मोबाईल रिस्टाई करण्यासह अनेक उपाय करुन बघितले मात्र मोबाईलमध्ये टॉवरच येत नसल्याने तसेच ईनकमिंग, आऊटगोईंग होत नसल्याने नागरिकांनी चौकशीसाठी शहरातील गणेश कॉलनीत वोडाफोन-आयडिया स्टोअर गाठेल. याठिकाणी नागरिकांची एकच गर्दी झाली होती.

पुण्याला अतिपावस झाल्याने तांत्रिक अडचणी

नागरिकांना चौकशीदरम्यान स्टोटरमधील कर्मचार्‍यांकडून पुणे येथे अतिपावसामुळे पुर्ण मशीन पाण्यात बुडाले. सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न असून त्रासाबद्दल क्षमस्व असा आशय असलेले फलकही स्टोअरच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले आहे. गेल्या आठवडाभरापासून वोडाफोन-आयडिया कंपनीच्या ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच अचानक सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला.