शहरासह जिल्ह्यात शाळांची घंटा वाजली

0

धुळेे। शहरासह तालुक्यातील शाळांची उन्हाळी सुट्टीनंतर गुरुवारी शाळेची घंटा वाजली आहे. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शहरातील बाफना हायस्कूल, जयहिंद हायस्कूल, जो.रा.सिटी सर्वच ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागत करण्यात आले. शाळेत येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांला शाळेचा पहिला दिवस आठवणीत रहावा म्हणून जपता यावा यासाठी शाळेसह परीसर सजवण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन तसेच मिठाई देऊन स्वागत करण्यात आल़े विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले. तालुक्यातील जिल्हापरिषद शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येते होता. उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळांमध्ये मुलांची गर्दी बघायला मिळाली. यानिमित्ताने शहरांतील गल्ली क्रमांक 5 मधील आनंदीबाई जावडेकर शाळेच्या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. मुलांना पुस्तकांची वाटप झाले. शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत सुसूत्रता यावी, यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळा 15 जूनपासून सुरू कराव्यात, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहरातील बहुतांश प्राथमिक व माध्यमिक शाळा गुरुवारी सकाळपासून सुरू झाल्या आहेत. उन्हाळ्याची सुटी संपून मुला-मुलींची पावलं पुन्हा शाळेकडे वळायला लागली आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसी नवीनच प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांना पालकांनी शाळेत सोडल्यानंतर आपले आश्रु अनावर झाले होते.

निजामपुर येथे प्रभात फेरी
निजामपुर । साक्री तालुक्यातील निजामपुर जैताणे येथील शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची तयारी पुर्ण झाली आहे. निजामपुर जैताणयात प्राथमिक मराठी व उर्दू शाळा आहे. पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गावात रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यात 88 हजार 516 विघार्थी गणवेश साठी पात्र आहे. पंरतु शासनाकड़ून एका गणवेशसाठी शिलाई व कापड़ खरीदी करण्यासाठी फक्त दोनशे रुपये मिळतात. 200 रूपये मुलाची शिलाई साठी दयावे लागते यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कमीत कमी एक गणवेश साठी 500 रुपये तरी मिळाले पाहिजे अशी मागणी पालकांनी केली आहे. साक्री तालुक्यातील निजामपुर जैताणे येथे गेल्या दिड महिन्याच्या सुट्टीनंतर आज माळमाथा परिसरातील शाळामध्ये पहिली घंटा वाजली असुन नविन वह्या पुस्तके नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेत पहिल्या दिवशी हजर झाले. शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी मुलांचे जोरदार स्वागत केले. गावात प्रभाती फेरी काढण्यात आली होती.

शिंदखेडा तालुक्यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती
शिंदखेडा । दोन महिन्यांच्या सूटी नंतर काल पासून शाळा पून्हा सूरू झाल्यात.शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तालूक्यात 165 प्राथमिक शाळा व 65 माध्यमिक शाळा आहेत.काल 15जून पासून शाळा सुरू झाल्या.प्रदिर्घ सुटी नंतर शाळेच्या पहिल्या दिवसी विद्यार्थ्यांची उपस्थिती फारशी नसते.परंतू विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विवीध योजना राबविल्याने पहिल्याच दिवशी शाळेमधे विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. पहिल्याच दिवशी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेचा परीसर व वर्ग स्वच्छ ,सुशोभित करण्यात आले होते.विद्यार्थी पहिल्याच दिवशी शाळेच्या गणवेशातच हजर होते. नवी पुस्तक मिळणार यामुळे विद्यार्थ्यी वेळे आधिच शाळेत हजर होते.नेहमी प्रमाणे राष्ट्रगीत व प्रार्थना झाल्यानंतर नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्याना पुस्तक वाटण्यात आली. तालूक्यातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पहिली ते आठवीच्या वगार्ंतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजने अंर्तगत पुस्तक वाटण्यात आलीत. या योजनेमुळे पालकांवरील आर्थिक भार कमी झाल्याने पालकांनी देखील समाधान व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक मिळावीत याचे संपूर्ण नियोजन शिक्षण विभागा कडून करण्यात आले होते.त्या प्रमाणे सुटीमध्येच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना कळविणेत आले होते. शासनाकडून राबविण्यात येणा-या मोफत पुस्तक योजनेमुळे विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढली आहे.तसेच शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे देखील सहज शक्य झाले आहे.
मनिष पवार, गटशिक्षणाधिकारी

पुस्तकाच्या किंमतीमध्ये दरवर्षी वाढ होते.त्यामुळे पालकांवर आर्थिक भार येत होता. अनेक वेळा शिक्षण अर्ध्यातूनच सोडून देण्याची वेळ आम्हा विद्यार्थ्यांवर येते .शासनाच्या या योजनेमुळे पालकांवरील आर्थिक भार कमी झाल्याने आम्हाला आनंद आहे. शासनाने हि योजना दहावी वर्गापर्यंत राबवावी अशी अपेक्षा आशाने व्यक्त केली आहे.
शितल मिस्तरी, विद्यार्थीनी

आमच्या मूलांनी देखील शाळेत जावे,शिकून मोठे व्हावे असे स्वप्न असते .परंतू आर्थिक परीस्थिती मुळे ते शक्य होत नाही.शासनाने सुरू केलेल्या या योजनेमुळे पालकांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे. शासनाने पुढील वर्षा पासून पूस्तकांचे पैसे विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करणेचा निर्णय घेतल्याचे कळते.याऐवजी पुस्तकच द्यावीत अशी प्रतिक्रिया लोटन मिस्तरी यांनी दै.जनशक्तिशी बोलतांना व्यक्त केली.

लोटन मिस्तरी, पालक

निरगुडीत तक्रार पेटी
शिंदखेडा । जिल्हा परिषद मराठी प्राथमिक डिजिटल शाळा निरगुडी तालुका शिंदखेडा येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच गुलाबराव पाटील, उपसरपंच तथा शाळाव्यवस्थापन समिती उपाध्यक्ष भाऊसाहेब गिरासे, सदस्य रमेश अहिरे , ग्रामस्थ, मुख्याध्यापक, उपशिक्षक व गावातील पालक उपस्थित होते. यावेळी शाळेत तक्रार पेटीचे उद्घाटन सरपंच गुलबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक चंपालाल पाटील यांनी केले. आभार सिमा वाघ यांनी मानले.

फुगे आकाशात सोडून विद्यार्थ्यांचे स्वागत
वरूळ येथील दिपकभाई पटेल इंग्लीश मेडिअम स्कुलमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून व फुगे आकाशात सोडून नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभाला शिरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी.झेड.रणदिवे, केंद्रप्रमुख मल्हारी सूर्यवंशी, संस्थाध्यक्ष प्रमोद पटेल उपस्थित होते.

बैलगाडी, ट्रॅक्टरवर मिरवणूक
शिरपूर । सुटी संपली..शाळा सुरू झाली.सुमारे महिना दिड महिन्याच्या शांततेनंतर उन्हाळ्यात ओसाड रानात गावात हुंदडणारी चिमणी पाखरं शाळेत परतलीत. तेच प्रश्न त्याच अडचणींवर मात करत जिल्हा परिषद शाळांमधेही उत्साहाने शिक्षक मुले प्रशासन स्पर्धकरता सज्ज झाले. वाड्यापाड्यात आजपासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली. तीन दिवस पूर्वतयारी करून आज 7 वाजेपासून ते संध्या 5वाजेपर्यंत जोमात शाळ ाप्रारंभ साजरा झालाय. प्रभातफेरी ,नवागतांचे फूल चाँकलेट, टोप्या देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, लेखनसाहित्य वाटप करण्यात आले. शाळा तोरण, पताका लावून सजविण्यात आली होती. तर विद्यार्थ्यांचे स्वागत वाजंत्री लाऊन करण्यात आले. बैलगाडी, ट्रँक्टर यावर मिरवणूकी निघाल्या. वातावरण आनंदाने भरून निघाले.

अंजदे बु ॥ ला सवाद्य मिरवणूक ; पाठ्यपुस्तकांचे वाटप
अंजदे बु। जिल्हा परिषद मराठी शाळा येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. सरपंच चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायततर्फे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच चंद्रकांत पाटील, उपसरपंच तुळशीराम मराठे, ग्रामसेवक एस. बी. पाटील, सदस्य ज्ञानेश्वर सुर्यवंशी, जाकीर खाटीक, छोटू मराठे, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक गुलाब कुरेशी, पुष्पांजली जाधव, भटू पाटील, वर्षा पाटील आदींनी कार्यक्रम यशस्वी केला.

उर्दू शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
नांथे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व जिल्हा परिषद उर्दू शाळा यांच्यातर्फेे शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तक वाटून मुलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष हाजी कलीमभाई, मुस्लीम पंच कमेटीचे अध्यक्ष जाकीर खाटीक यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलांच्या स्वागतानंतर मुलांची गावातून रॅली काढण्यात आली. रॅलीस उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जुबेर खाटीक, मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चौधरी यांचे सहकार्य लाभले.

तर्‍हाडी जि.प.शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
तर्‍हाडी । शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडी येथे जि.प.शाळेत शाळेच्या महिल्या दिवशी सर्व मुलांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र खोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सर्व प्रथम गावात दिंडी काढून नव्याने दाखल झालेल्या मुलांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. तसेच सदस्य रावसाहेब चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पालक व मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण सूर्यवंशी यांनी केले.