नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यातील 15 हजार शेतकर्यांना 190 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. शेतकर्यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण करावे. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी येथे केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, खासदार हिना गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगरपालिका नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, , अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील, गोरक्ष गाडीलकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, अर्चना पठारे, सुधीर खाडे, जयसिंग वळवी, देवदत्त केकाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अ.ल. पवार जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी धमेंद्र जैन, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
किओस्क मशीनचे लोकार्पण
जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आवश्यक कागदपत्रे सहज व तात्काळ उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात किओस्क मशिनचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले, या मशीन द्वारे ऑनलाईन डिजीटल 7/12 स्वाक्षांकित स्वरूपात प्राप्त होणार आहे तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलच्या सर्व सेवा, -ढच् सुविधा, कोर्ट केसेसची माहिती, खछऊएद-2 ची प्रत, ऊखॠखङजउघएठ, अशा अनके सुविधा सर्वांसाठी या टच स्क्रीन किओस्क मशीन द्वारे प्राप्त होणार आहेत. यावेळी पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पंचायत समिती सभापती सविता गावीत, नवापूर व एन.डी. वाळेकर गट विकास अधिकारी नवापूर, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत प्रथम-पुरस्कार सरपंच ज्योतीबेन पाटील, द्वितीय पुरस्कार सरपंच शकुंतला गावीत व तृतीय पुरस्कार बेबीबाई पाडवी, सार्वजनिक बांधकाम विभागातील लेखा शाखेचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल बी.एल. मोरे, तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार राजेश परदेशी, यांना मिळाल्याबद्दल पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाश चौधरी यांनी केले.
नंदुरबार जिल्हा पुस्तिकेचे प्रकाशन
जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार यांनी तयार केलेली आपला नंदुरबार जिल्हा पुस्तिका विद्यार्थ्यांसह अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल. यामधून आदिवासी संस्कृतीला एक प्रकारे उजाळा देण्याचे काम या पुस्तीकेच्या माध्यमातून होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना व पर्यटन विकास मंत्री ना.जयकुमार रावल यांनी येथे केले. पालकमंत्री श्री.रावल यांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार यांनी तयार केलेल्या आपला नंदुरबार जिल्हा पुस्तिकेचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली पुस्तिका संग्राह्य आहे. या पुस्तिकेत जिल्ह्याची थोडक्यात पण चित्ररुपातून देण्यात आलेली माहिती नागरिकांना उपयुक्त ठरेल, अशा प्रकारचे उपक्रम जिल्हा माहिती कार्यालयाने राबवावेत, असेही त्यांनी नमूद केले.
नाईक विद्यालयात ध्वजारोहण
शहादा । येथील वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलात 15 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण माजी उपनगराध्यक्ष शेख इस्माईल आलम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे विभागीय सचिव प्रा. संजय जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव वर्षा जाधव , समन्वयक संजय राजपुत, प्राचार्य डॉ. ए. एन. पाटील, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष महाले, शारदा कन्या विद्यालयाचा प्राचार्या एस. झेड. सैय्यद, पर्यवेक्षक सुनिल सोमवंशी, एम. बी.मोरे, उपप्राचार्य आर. जे. रघुवंशी, आर. बी.मराठे , डॉ. एच. एस. पाटील , शारदा प्राथमिक विद्यालयाचा मुख्याध्यापिका नर्मता पाटील उपस्थित होते. विद्यालयाचा छात्रसेनेचा विध्यार्थ्यानी संचलन करुन ध्वजाला मानवंदना दिली. सुत्रसंचालन एन.बी. कोते यांनी केले. वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रेमांकुर या मासिकाचे सस्थेचे विभागीय सचिव प्रा. संजय जाधव व वर्षा जाधव यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे समन्वयक संजय राजपुत, प्राचार्य डॉ. ए. एन. पाटील, नंदुरबार महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुनिल पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. एच. एस. पाटील यानी केले तर महिला महाविद्यालयात माजी उपनगराध्यक्ष शेख इस्माईल आलम व वर्षा जाधव यांचा हस्ते भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेचे विभागीय सचिव प्रा. संजय जाधव , समन्वयक संजय राजपुत, प्राचार्य डॉ. सुभाष महाले उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. श्रीमती अहिरराव यांनी केले.
दुधखेड़ा विद्यालयात स्वतंत्र दिवस साजरा
खेड दिगर । श्री नागेश्वर माध्यमिक विद्यालयात स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धजारोहण सरपंच कल्पना शेमळे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण श्रीफळ वाढवून पूजन केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. देशभक्ति गीत ,भाषण, करण्यात आली. यावेळी पोलिस पाटील श्यामराव चव्हाण, विविध पदाधिकारी, युवक,ग्रामस्थ, शिक्षकशिक्षिका,कर्मचारी उपस्थित होते. शेवटी स्वच्छते बद्दल शपथ घेवून कार्यक्रमाचि सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन महेंद्र चव्हान यांनी केले.
तळोदा येथे वृक्षारोपण
तळोदा । दिग्विजय सेवाभावी प्रतिष्ठानने स्वतंत्र दिनानिमित्तान तळोदा शहरात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान ,कचरा पेटीचे वाटप , सरकारी रूग्णालयात फळवाटप करून अनोख्या पध्दतीने स्वतंत्र दिन साजरा केला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक मुकेश पवार उपस्थित होते. कार्यक्रमात अध्यक्ष दिग्विजय माळी उपाध्यक्ष नितीन वाणी अक्षय जाधव चेतन मगरे सौरव शुक्ला तुषार चौधरी ललित पटेल रोहीत चौधरी दिनेश पाडवी या सर्वानी परीश्रम घेतले.पुढे ही असेच कार्यक्रम आयोजित करून समाजसेवा करण्याचा मानस अध्यक्ष दिग्विजय माळी यांनी व्यक्त केला.