पिंपरी चिंचवड :- शहर आणि परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात येणा-या वाहन तोडफोडीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. निगडी येथे काल रात्री आठ ते दहा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. अज्ञातांनी धारदार शस्त्र आणि दगडाच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड केली आहे. गेल्या चोवीस तासातील ही दुसरी घटना असल्याने पसिरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.