शहर काँग्रेसने काढला ‘संविधान बचाव’ मूकमोर्चा

0

चिंचवड (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाजप सरकारच्या विरोधात ‘संविधान बचाव, लोकतंत्र बचाव’ या मूक मोर्चाचे आयोजन केले होते. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी त्यात सहभाग घेतला. यावेळी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारच्या धोरणांचा जोरदार निषेध करण्यात आला. चिंचवड येथील चापेकर चौकात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पिंपरीतील एच. ए. कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मूक मोर्चास सुरुवात झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाची सांगता झाली. यावेळी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महिला प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम अगरवाल, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक विभागाचे चिंचवड ब्लॉक अध्यक्ष फय्याझ शेख, माजी अध्यक्ष भाऊसाहेब मुगूटमल, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, पश्‍चिम महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष तारीक रिझवी, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष विशाल कसबे, सज्जी वर्की, राजन नायर आदी उपस्थित होते.