शहर निर्जंतुकीकरणासाठी फवारणी; ट्रॅक्टरसह लहान, मोठ्या बंबाची मदत

0

जळगाव,- शहरात कोरोनाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी रविवारी तात्काळ मनपाचे पथक पाठवून मेहरूण परिसर निर्जंतुक करण्यासाठी फवारणी मोहीम राबविली. शहरात सर्वत्र मोहीम राबविणे आवश्यक असल्याने सोमवारी शहरातील अनेक प्रभागात निर्जंतुकीकरण करण्यास प्रारंभ झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर भारती सोनवणे यांनी मनपा प्रशासन आणि काही सामाजिक संस्था, समाजसेवक यांच्या माध्यमातून शहरात निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम सोमवारी हाती घेतली. मनपाच्या मलेरिया विभागात ब्लिचिंग पावडरच्या साहाय्याने मोठ्याप्रमाणात केमिकल तयार करण्यात येत आहे. महापौर भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी स्वतः त्याठिकाणी जाऊन पाहणी केली.

अनेक प्रभागात फवारणी
महापौर भारती सोनवणे यांनी मनपा प्रशासनामार्फत नगरसेविका प्रतिभा सुधीर पाटील, चंद्रशेखर पाटील, लताताई भोईटे, मनोज चौधरी, प्रतिभा गजानन देशमुख, प्रतिभा कापसे, विजय पाटील, सदाशिवराव ढेकळे, रेखा पाटील, सुरेखा सोनवणे, राजेंद्र पाटील, सुनील महाजन, जयश्री महाजन, शबानाबी शेख, प्रशांत नाईक, चेतना चौधरी, किशोर चौधरी, चेतन सनकत यांच्या प्रभागात फवारणी मोहीम राबवली.

नगरसेवकांनी केली स्वखर्चाने फवारणी
स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, अतुलसिंग हाडा, रेश्मा काळे, अमित काळे, कुंदन काळे, शोभाताई बारी, अतुल बारी, कुलभूषण पाटील, सुरेश सोनवणे, झाकीर पठाण, मनोज काळे, मयूर कापसे, धीरज सोनवणे यांनी स्वखर्चाने आपल्या प्रभागात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली.

दात्यांचे महापौरांकडून आभार
शहरात फवारणी करण्यासाठी जैन इरिगेशनचे अशोकभाऊ जैन यांनी मोठा बंब, सातपुडा ऑटोमोबाईल्सचे प्
किरण बच्छाव, पिलखेडा येथील उमानंद चौधरी यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिलेले असल्याने महापौर भारती सोनवणे यांनी त्यांचे आभार मानले आहे.