परतवाडा येथील चालक जखमी
भुसावळ :– शहर पोलिस ठाण्याच्या नाईट पेट्रोलिंग करणार्या सरकारी वाहनावर स्विफ्ट डिझायर कार आदळून झालेल्या अपघातात परतवाडा येथील चालक किरकोळ जखमी झाला. रविवारी रात्री सव्वा वाजेच्या दरम्यान जळगावरोडवरील टेक्निकल हायस्कूलसमोर ही घडना घडली. याबाबत शहर पोलिसांत डिझायर कारचा चालक संजय यादव विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिस ठाण्याचे (एमएच 19 एम 0632) या वाहनाने हेड कॉस्टेबल शे जमील अहमद व चेकींग अंमलदार अविनाश चौधरी हे रविवारी रात्री पेट्रोलिंग करण्यासाठी निघाले. याच दरम्यान जळगावरोडवरील टेक्नीकल हायस्कूलकडून भरधाव वेगाने स्विफ्ट डिझायर कार (एमएच 18 एजे 3862) येताना दिसली. यामुळे सरकारी पेट्रोलिंग वाहनचालक हेड कॉस्टेबल शे. जमील यांनी वाहन थांबवून घेतले. मात्र भरधाव वेगाने येणार्या वाहनाने डिव्हाईडर व पालिकेचा विजपोल, मिनी डीपी तोडून थेट शहर पोलिस ठाण्याच्या सरकारी वाहनाला धडक दिली.
या अपघातात स्विफ्ट डिझायरचा चालक संजय यादव रा. परतवाडा जि. अमरावती हा जखमी झाला. याच कारमधील राजेश प्रकाश परदेशी रा. जुना सतारे कोळी वाडा, भुसावळ याच्या मदतीने जखमीस खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताच स्विफ्ट डिझायर गाडीचे टायर फुटले तर शहर पोलिस ठाण्याच्या वाहनाचे बंफर व दरवाजा वाकून तसेच नंबर प्लेट तुटून नुकसान झाले. या बाबत रस्त्याच्या परिस्थितीकडे दूर्लक्ष करुन सरकारी वाहन तसेच पालिकेच्या पोलची नासधूस करणे, स्वत.च्या दुखापतीस जबबादार असल्याने चालक यादव विरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.