शहर पोलिसांनी दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

0

जळगाव। गेल्या काही महिन्यांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्या होत्या. यातच शहर पोलिस दुचाकीच्या चोरट्यांच्या मागावरच असतांना शनिवारी दुचाकी चोरटा सुप्रिम कॉलनी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानी त्याच दिवशी सापळा रचून चोरटा मोहम्मद आरीफ खान हाफीज खान या चोरट्याला अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्याने चोरलेल्या सात दुचाकी काढून दिल्या आहेत. दुचाकी फिरविण्यासाठीच तो चोरी करायचा तर पेट्रोल संपल्यावर तो त्याच जागी दुचाकी उभी करून निघून जायचा अशी माहिती माहिती पोलिस चौकशीत समोर आली. यातच त्याच्याकडून अन्य काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सुप्रिम कॉलनीतून अटक…
प्रेमनगर येथील रहिवासी अनिल भगवानदास झवर यांची एमएच.19.एएफ.7668 ही दुचाकी चोरट्याने 15 एप्रिल रोजी रेल्वेस्टेशनच्या मागील बाजूला असलेल्या रिक्षा स्टॉपजवळून चोरून नेली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास डिबी कर्मचारी गणेश शिरसाळे हे करीत होते. या दरम्यान, डिबी कर्मचारी अकरम शेख यांना सुप्रिम कॉलनी राहणारा मोहम्मद आरीफ खान हाफीज खान (वय-23) हा रोजच दुचाक्या बदलत असून त्या चोरीच्या असल्याची माहिती मिळाली. ही माहिती अकरम शेख यांनी पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांना दिली. त्यानंतर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखली गणेश शिरसाळे, अकरम शेख, इम्रान सैय्यद, सेजय शैलार, दिपक सोनवणे, सुधिर साळवे, दृश्ंयत खैरनार, अमोल विसपुते, मोहसीन बिरासदार, संजय भालेराव आदींच्या पथकान सुप्रिम कॉलनी गाठत सापळा रचला. यानंतर त्याला घरातून पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने दुचाकी चोरी केल्याची कबूली देत अनिल झवर यांनी दुचाकी नवीपेठेतून काढून दिली. तर त्याने अन्य सहा दुचाकी ह्या घराजवळील बखळ जागेत लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगून त्या दुचाकीही काढून दिल्या.

या दुचाक्या दिल्या काढून
शहर पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर मोहम्मद आरीफ खान हाफीज खान याने नवीपेठेतून एमएच.19.एएफ.7668, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून बजाज डिस्कव्हर क्रं.एमएच.19.बीसी.7325, बजाज डिस्कव्हर (विना क्रंमाक), सीबीझेड क्रं. एमएच.30.जी.8664, स्कुटर क्रं.एमएच.19.एम.2063, बजार फोर एस चॅम्पीयन क्रं.एमएच.19.एच.6101, हिरोहोंडा हंक (विना क्रंमाक) अशा सात दुचाकी त्याने पालिसांना काढून दिल्या आहे. मोहम्मद आरीफ हा मुळचा मध्यप्रदेश राज्यामधील रेवा जिल्ह्यातील घोगर गावातील रहिवासी असून तो गेल्या दोन वर्षापासून सुप्रिम कॉलनीत राहतो आहे. तर गेल्या दिड महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले आहे. फिरण्यासाठी तो दुचाकी चोरी करायचा. यासोबतच दुचाकीचे पेट्रोल संपल्यावर तो त्याच जागी दुचाकी सोडून द्यायचा अशी माहिती चौकशी समोर आली आहे.