शहर पोलीस स्टेशनला बेवारस वाहन जप्त

0

भुसावळ। येथील शहर पोलीस स्टेशनला हद्दीत बेवारस लावलेली पाच दुचाकी वाहन जप्त करण्यात आलेली आहे. शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार्‍या बेवारस दुचाकी वाहनांना जमा करण्यात आले असून एमएच19 के 6235 स्पेल्डर, एमएच 19, क्यू.3582 हिरो होंडा, एमएच 30, यु 3515, सुपर स्पेल्डर, आरजे 02, एसएक्स 7635 पल्सर, एमएच 19, एए 7940 हिरो होंडा स्पेडर असून 25 जुलै पर्यत मूळ मालकांनी कागदपत्र घेऊन शहर पोलीस स्टेशनला सकाळी 10 वाजता हजर रहावे अन्यथा लिलाव प्रकिया केली जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांनी दिली.