शहर पो.नि. पदी रामेश्वर गाढे पाटील रूजू

0

चाळीसगाव । चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन निरिक्षक पदी जळगाव जिल्हा वाहतुक शाखेचे निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांनी तर ग्रामीण पोलीस स्टेशनला निरीक्षक म्हणुन पारोळा येथुन आलेले भाउसाहेब पठारे यांनी मंगळवारी 30 मे 2017 रोजी पदभार स्विकारला आहे. पोलीस निरीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या कडुन रामेश्वर गाडे पाटील यांनी पदाची सूत्रे स्विकारली यावेळी दोन्ही अधिकार्‍यांनी एकमेकांचा सत्कार केला तर मावळते निरिक्षक श्री बुधवंत यांचा व श्री गाडे पाटील यांचा कर्मचारी यांनी सत्कार केला.

यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, गणेश पवार, तालुका अध्यक्ष दिलीप घोरपडे, दैनिक बाजीराव चे संपादक सुनील राजपुत यांनी दोघा अधिकार्‍यांचा सत्कार केला.