महापालिकेतर्फे ‘जळगाव महोत्सव’ उत्साहात

0

जळगाव – जळगावच्या मानाचा गणपतीचे औचित्य साधून जळगाव शहर महापालिकेतर्फे “जळगाव महोत्सवात’ आज “गीताशिल्प’ हा कार्यक्रम छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आयुक्त चंद्रकांत डांगे, माजी महापौर ललित कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला गणेश वंदना म्हणून गणपती उत्सवाला रंगत आणून, सुरेश भट यांच्या गजल सादरीकरणातून कार्यक्रमाला रंगत आणली. गायक “सारेगमप’ फेम आकांक्षा नगरकर, इंडियन आयडॉल मधील लोकप्रिय कलाकार सौरभ दफ्तरकर, अभिलाषा चेल्लम, संदीप उबाळे यांनी सादर केलेले गजल, मराठी-हिंदी गाण्यांच्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे निवेदन अभिजीत कुलकर्णी यांनी केले. साथ संगितीला (सिंथेसायझर) विवेक परांजपे, मिहीर भडकमकर, (तबला) विशाल गंडतवार, (ढोलक) पद्माकर गुजर, (वेस्टर्न रीदम) अभय इंगळे.

सादर झालेले गाणी… 
कधी तु रीमझीम, ही गुलाबी हवा, मैंने तेरे लीये, ओ सजना, बाहोंमे चले आओ, मेरे सपनों की, जिंदगी एक सफर, झुमरु, जीव दंगला, आम्ही ठाकर ठाकर, शारद सुंदर, मन उधाण, येड लागल, वाजले की बारा, मै तेणु समझॉंवां, अभी मुझमें कही, दमादम मस्त कलंदर, परदा है परदा, देवा श्री गणेशा

आज “एकदंताय वक्रतुंडाय’ संगीत कार्यक्रम 
जळगाव महोत्सवात उद्या सायंकाळी 7 वाजता मनपाच्या प्रशाकीय इमारतीच्या प्राणंगात “एकदंताय वक्रतुंडाय’ हा भावगितांचा कार्यक्रम महोत्सवात आयोजित केला आहे. स्वरवेध फाउंडेशन प्रस्तुत अभिंयता भावगत पाटील व त्यांचे कलावंत हा भावगितांचा कार्यक्रम सादर करणार आहे.