शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी किरण सोनवणे

0

चोपडा । कस्तूरबा माध्यमिक शाळेत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या मासिक सभेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीपभैय्या पाटील यांनी हातेड बु. तथा ग.स.सोसायटी जळगाव शाखा चोपडा येथील किरण प्रतापराव सोनवणे यांची चोपडा शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करून निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

निवडीबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक माजी आमदार डॉ.सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, सहकार गटाचे अध्यक्ष बी.बी.पाटील, जळगाव जिल्हा परिषद आरोग्य सभापती दिलीप पाटील, नगरसेविका सुप्रिया सनेर, सुरेखा माळी, तालुकध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष राजाराम पाटील यांच्यासह आदिंनी अभिनंदन केले.

शहराध्यक्ष संजीव बाविस्कर, महिला तालुकाध्यक्ष वंदना बाविस्कर, सूतगिरणी संचालक राजू पाटील, कृउबा माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे, प्रदीप पाटील, विनायक सोनवणे, मधुकर बाविस्कर, अशोक साळूंखे, दारुटे सर, वजाहत काझी, अ‍ॅड. जहागीरदार, ग.स.सोसायटी माजी संचालक रमेश शिंदे, मंगेश भोईटे, संचालक देवेंद्र पाटील, कांतीलाल सनेर तसेच किरण सोनवणे मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.