‘सेल्फी विथ खड्डा’ पाठवा, 100 रुपये मिळवा!
पिंपरी-चिंचवड : शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून सत्ताधारी भाजप शहरवासियांच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने ’सेल्फी विथ खड्डा’ हा उपक्रम सुरु केला आहे. शहरातील रस्त्यावरील खड्ड्याचे फोटो विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या 9822199599 आणि युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या 9970037513 या व्हॉटसअॅपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फोटो पाठविणार्याला प्रत्येक खड्यांनिहाय 100 रुपये दिले जाणार आहेत.
विरोधी पक्षनेता देणार पैसे
साने म्हणाले, शहरात खड्डेच खड्डे असताना केवळ 349 खड्डे असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तर, तीन महिन्यांपूर्वी संपूर्ण शहर खड्डे मुक्त झाल्याचे पत्र शहरअभियंत्यांनी दिले होते. खड्डेच खड्डे असताना असे उत्तर देऊन शहरवासियांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. यासाठी शहरातील रस्त्यावर जेवढे खड्डे आहेत. त्या खड्यांचे सेल्फी विथ खड्डा हा उपक्रम सुरू केला आहे. खड्यांसोबतच सेल्फी काढून खड्यांचे ठिकाण, स्वत:चे नाव व मोबाईल नंबर टाकून तो फोटो विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या ’माझा सेल्फी विथ खड्डा’ या फेसबुक पेजला टॅग करावा. अथवा वरील व्हॉटसअॅपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फोटो पाठविणा-याला प्रत्येक खड्यानिहाय 100 रुपये दिले जाणार आहेत. यामुळे सत्ताधारी आणि प्रशासनाला जाग येऊन शहर खड्डेमुक्त होईल आणि शहरवासियांचा मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास कमी होईल.