शिक्रापूर । शिरूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यकारणीमध्ये काही महिला कार्यकर्त्यांची नवनियुक्ती करण्यात आली. यामध्ये वैशाली प्रताप थोरात, फरीदा चाँद शेख, सारिका रवींद्र वीरशैव यांची शिरूर शहर महिला उपाध्यक्षपदी तसेच वैशाली अमोल कांबळे व मधुरा महेंद्र परदेशी यांची शिरुर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. माजी आमदार अॅड. अशोकबापू पवार व शहराध्यक्ष पल्लवी शहा यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी शिरुर तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वास काका ढमढेरे, युवक अध्यक्ष कुंडलीक शितोळे, आबाराजे मांढरे, पंचायत समिती सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिकाताई हरगुडे, शिरुर महिला अध्यक्ष विद्याताई भुजबळ, शहर युवक अध्यक्ष रंजनभैया झांबरे, अमोल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.