विविध प्रलंबित व रखडलेल्या प्रश्नांवर केली चर्चा
पिंपरी-चिंचवड : शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील मोदीबागेत भेट घेतली. या भेटीत तब्बल सुमारे तासभर त्यांच्याशी शहरातील विविध प्रलंबित व रखडलेल्या प्रश्नांबाबत चर्चा झाल्याचे महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सांगितले. शिष्टमंडळात महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, पंकज भालेकर आदी उपस्थित होते.
मांडल्या अनेक समस्या
या भेटीत मेट्रोचे रखडलेले काम, बीआरटीएसचा बोजवारा, विस्कळीत पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकामे, शास्तिकर, मेट्रो, बीआरटीएस, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, मेट्रो, भामा आसखेड शहरातील पार्किंगची समस्या, वाढते प्रदूषण, पवना नदी सुधार या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य व केंद्र पातळीवर आपल्या मार्फत प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा पदाधिकार्यांनी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली.