शहर विकासाच्या व्हिजनलाच मतदारांची पसंती

0

पालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून शहर विकासचे व्हिजन असणार्‍याला उमेदवारानांच आमची पसंती असेल, असे मतदारांमधून बोलले जात आहे. मतदार यादीचा पूर्ण अभ्यास उमेदवार व कार्यकर्त्यानी करुन ठेवला आहे एका मतदारांचे नाव अन्य प्रभागत ही आहे म्हणजे डबल नावे आढळुन आली आहेत तसेच मयतांची नावे ही आहेत फोटो पुरुषाचा व नाव स्त्रीचे असे ही आहेत अनेक ठिकाणी फोटोच नाही त्यामुळे मतदार आोळखतांना अडचणी येत आहेत मतदारांची नावे दोन ठिकाणी असल्याने मतदानाचा दिवशी मतदार पळापळी होणार आहे. अनेक प्रभागात पाच व दहा उमेदवार उभे आहेत तेथे काँटे की टक्कर होऊन उमेदवाराचा विजय हा काठावरच होणार असल्याचे चित्र आहे.प्रभाग 2, 5,7,10,8 याकडे अनेकांचे लक्ष लागुन आहे तोडीस तोड प्रचार येथे होत असुन काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे या प्रभागात कोण विजयी होईल यावर पैजा लागल्या आहेत.

पालिकेत महिलाराज येणार असुन नगराध्यक्षा ही महिलाच राहणार आहे प्रभाग 3 मध्ये विद्यमान नगरसेविका मेघा जाधव तर प्रभाग 8 मध्ये विद्यमान नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांचा पत्नी रेखा नगराळे उमेदवारी करत आहेत तर विद्यमान नगरसेवक अजय पाटील यांचा पत्नी हेमलता पाटील या काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहेत तसेच विद्यमान नगरसेविका ज्योती जयस्वाल या भाजप सेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहेत. विद्यमान नगरसेवक नरेंद्र नगराळे यांचा पत्नी डाँ अर्चना नगराळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहेत त्यामुळे या सर्वांना आपल्या सौ साठी प्रचारात चांगलीच कसरत करावी लागत आहे सौ चा विजयासाठी श्री ची दारोदारी पायपीट सुरु आहे निवडणुकीत जरी महिला उमेदवार निवडुन आल्या तरी पतीदेवच त्यांची कामे पाहतात तेच सर्व काही असुन निर्णय घेतात हे चित्र सर्वदुर काही ठिकाणी आहे .जास्त हुशार महिलांही राजकारणात चालत नाही अस म्हणतात. अनेक वर्ष विकासाचे मोठे दिवा स्वप्न निवडणुकीत मतदारांना दाखवले जाते निवडणुकीत शेखचिल्ली प्रमाणे मतदार शहराचा सर्वागिण विकासाचे स्वप्न पाहतो मात्र पाच वर्ष विकास न होता भकास परिस्थिती पाहायला मिळते प्रभागात कवडीचे काम ते करत नाही. शो पीस बनुन ते मिरत असतात.नगरसेवक लेबल लावुन फिरताक, निवडणुकीत मतदारांना विकासाचे गाजर दाखवुन नगरसेवकाचा आडमधुन ठेकेदार होऊ पाहणार्याना यावेळीस दुर ठेवण्याची बोलकी प्रतिक्रीया मतदार देत आहेत.ठेका घेऊन रस्ते खाणार्या व मतदारांचा विश्वासघात करणार्या व त्यांना विसरणार्‍याला कायमचा दुर करण्याचा निर्धार मतदार करत आहेत एक ठेका घेतो त्याचे काही वाटेकरी असतात त्यात काही भांडतात अनेक खमंग चर्चा होते कमीशन खाणारे, विदेशी दौरे हे चित्र आता बदलले पाहीजे मतदारांनी पाच वर्ष हे सर्व पाहीले आहे हे कटु सत्य नाकारुन चालणार नाही.किती वेळा फसवणार मतदारांना असे मतदार उघड उघड बोलू लागला आहे जो पक्ष विकासाचे व्हिजन घेऊन नवापुर नगरीचा खरोखर सर्वागिण विकास करेल अशांनाच आपण मत देऊ असे स्पष्ट मत नवीन मतदार व जुने मतदार यांंनी बोलतांना सांगितले.

शहर विकासाचा मतदरांना खुपच अपैक्षा आहेत आम्ही दरवेळी मतदान करुन प्रभागाचा विकासाची स्वप्न पाहतो पण उमेदवार निवडुन आल्यानर प्रभागाचा विकास तर दुर आम्हाला तो ओळखत ही नाही. पाच वर्ष तोंड दाखवत नाही पक्षांचा अजेंडा चुलीत टाका भुलधापा बंद करा.ठेकेदार नगरसेवक नको तर वेळोवेळी प्रभागात जाऊन समस्या सोडवणारा स्थानीक नगरसेवक पाहीजे असे मतदार राजाचे स्पष्ट मत असुन पक्ष नेत्यांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे. सध्या प्रभागात प्रचारातुन शक्ती प्रदर्शन दाखवत लोकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न होतो आहे तर मतदार उमेदवारांचे हावभाव,मागील इतिहास,सोबत कोण यावर बारीक लक्ष ठेवुन चर्चा करु वागला आहे. हा किती चांगला तो किती वाईट यावर चर्चा करुन आपले मत मांडत आहे होम टु होम प्रचार भेटीत उमेदरवारांजवळ अनेक गोष्टी मतदार बोलु लागला असुन मागचा इतिहास सांगुन भडास काढुन घेत. आहे कार्यकर्त उमेदवाराचा फायदा घेऊन रोज चटपटीत भोजनवर ताव मारत आहे मागचा वाईट सवयीची पुन्हा पुनारावृती होत असुन काही गोष्टी भविष्यात घातक ठरणार आहे यावर उमेदवारांनीच पायबंद घालणे आवश्यक आहे आचार संहिता पथक व पोलीस प्रशासनाची करडी नजर सर्वत्र असुन व्हिडीओ चित्र करण होत आहे कुठे सगेसोयरे तर कुठे खाजगी संस्थेतील कर्मचारी,संस्थाचालक यांचे नातेवाईक,एकाच कुटुंबातील,मित्र आमने सामने उभे आहेत यात काही मागील घटनेची पुनरावृती झाली आहे एक दोन नगरसेवक सोडले तर विद्यमान सर्व नगरसेवक उमेदवारी करत आहे काहींना आपल्या पत्नीला तर काहीनी आपल्या नातेवाईकांना संधी दिली आहे मतदान केंद्र निश्चिति झाली असुन उमेदवार कार्यकर्त प्रचार रणनितीत व्यस्त दिसत आहे पावसाने प्रचाराला ब्रेक दिला. घोडा मैदान जवळच आहे 13 तारीख जश जशी जवळ येत असुन वातावरण थंडीत ही राजकीय वातावरण तापायला लागले आहे.!

– हेमंत पाटील, नवापूर
9823610627