नवापूर। नवापूर विकास आघाडीच्या वतीने नवापूर नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कामांचे तसेच आपत्ती व्यवस्थापणाचे तीनतेरा झाल्याने परीसरातील नाल्यांमधून येणारी दुर्गंधी, मुतार्याची दुर्दशा, रस्त्यावरील खड्डे, नागरिकांच्या विरोधामुळे रखडलेली रस्त्यांची कामे ह्यावर 5 जुलै 2017 रोजी दिलेल्या निवेदनाच्या पाठपुरावा करीत वरील समस्यांबाबत तहसीलदार प्रमोद वसावे यांच्याशी चर्चा करून नगर पालिका संबंधीत सर्व विभागाशी त्वरित बैठक घेऊन निर्णय देण्याचे आश्वासन देण्यात आले.
तसेच आघाडीचा पदाधिकार्यानी नगरपालिका मुख्याधिकारी यांची भेट घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करून चर्चा करण्यात आली. यावेळी संदिप पारेख, मंगेश येवले, जितु अहिरे, अॅड. नितीन देसाई, रामु गिरासे, जितु मराठे, मुन्ना पाटील आदी उपस्थित होते.