शहर स्वच्छ ठेवणे सर्वांची जबाबदारी – अपर्णा मोरे

0

खालापूर । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आरोग्य खात्यातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी सातत्याने सजग राहिले पाहिजे असे प्रतिपादन खोपोलीच्या आरोग्य सभापती अपर्णा सचिन मोरे यांनी केले. आपले शहर स्वच्छ कसे राहील याची जबाबदारी प्रशासनाची आहे, तसेच नागरिकांची आहे. घरातील कचरा उघड्यावर किंवा गटारात न टाकता पालिकेच्या कचरा गाडीमध्येच टाकावा. प्रत्येक प्रभागात ठरवून दिलेल्या वेळेवर कचरा गाडी पोहोचेल याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांना सेवा देणे आपले कर्तव्य
कचरा उचलणारे ठेकेदार व्यवस्थित काम करतात की नाही प्रत्येक प्रभागात कचरा उचलला जातो की नाही, गटारे तुंबलेली साफ होतात की नाही ही आरोग्य खात्याच्या अधिकारी व सुपरवायझरची जबाबदारी असून, नागरिकांना चांगली सेवा देणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित स्वच्छतेचा शिवधनुष्य उचलुया असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला आरोग्य निरीक्षक प्रफुल्ल गायकवाड, सुपरवायझर अशोक गायकवाड, शिवदास कांबळे, दिनेश गायकवाड, विनोद सोनावणे, बबन वाघमारे, वैभव ओव्हाळ, दिलीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.