नगर: कालपासून संपूर्ण राज्यात पावसाचे वातावरण झाले आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दरम्यान आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी राज्यात दिग्गज नेत्यांची सभा सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडमध्ये महायुतीचे उमेदवार मंत्री राम शिंदे यांच्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभा घेणार होते. मात्र पावसामुळे ही सभा रद्द झाली आहे. आजच राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी शेवटची सभा घेतली.
कर्जत-जामखेडमध्ये भाजपच्या राम शिंदे यांच्याविरोधात शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या ठिकाणी दोघांमध्ये जोरदार टक्कर होणार आहे. कोण बाजी मारेल? याबाबत सांगणे कठीण झाले आहे.
एकीकडे काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भरपावसात सभा घेऊन संपूर्ण राज्यात वातावरण निर्मिती केली असताना आज पावसामुळे अमित शहा यांची सभा रद्द झाली आहे.