शहादातील पोलीस निरिक्षकाला बडतर्फ करा!

0

मुंबई : शहादा (नंदूरबार) शहरातील कायदा सुव्यवस्था बिगडवणाऱ्यांवर कारवाई करण्यात अवयशी ठरलेल्या आणि गैरप्रकारांना पाठीशी घालणारे पोलिस निरिक्षक शिवाजी बुधवंत यांची बदली करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नंदूरबार जिल्हा अध्यक्ष विक्की मोरे हे मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. विक्की मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष जैलाब शेख, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष विलास निकाळे तसेच शहादातील विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी उपोषणाला पाठींबा दर्शवला आहे.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शहादा शलराचे वातावरण गढूळ झाले असून शलरात गुन्हेगारीचे प्रमाण ऴाढले आहे. शलरात एखादी घटना घडली असता पोलिसांकडून गुन्हेगारांची तक्रार सर्वात आधी नोंदवली जाते आणि पीडितांना आरोपी घोषित केले जाते. त्याच्या विऱोधात मुंबईतील आझाद मैदानात शहादा जिल्ह्यातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन केले असून नंदूरबार जिल्हा अध्यक्ष विक्की मोरे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. शहादा शहरात शांतता, सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता आणि तेथील जनतेला शांततेत जीवन व्यथीत करण्या करता शहरातील अवैध धंदे आणि गुंडगिरीचा नाश होणे फार आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सागितले. त्याचबरोबर गुंडांना पाठींबा देणारे शिवाजी बुधवंत यांना बडतर्फ करण्याची आणि सीबीआय आणि साआयडी मार्फत तपासणी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

उपोषणाचे कारण
1. अवैध धंदे व गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या शहादा पोलिस निरीक्षकाची बदली झालीच पाहिजे.
2. शहादा परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे साम्राज्य
3. शहादा शहराची बिघडतपरिस्थिती
4. पोलिस निरिक्षकांचा मनमानी कारभार
5. गुन्हेगारांना पोलिस निरिक्षकांकडून मिळणारे प्रोत्साहन
6. पोलिस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घडणारे गुन्हे.