शहादा आगारातून मुलींसाठी पुरेशा बस नसल्याने मुलींच्या शिक्षणाला ब्रेक

0

शहादा । शहादा आगारतून मानव विकास मिशन अंतर्गत मुलींसाठी पुरेशा बस नाहीत.म्हणून प्रकाशा, वैजाली, दरा या रस्त्याला मानव विकासची बस सुरू करावी व मा.जिल्हा अधिकारी व आगारप्रमुखांनी हि समस्या मार्गी लावावी अशी मागणी या परीसरातील विद्यार्थ्यानी व पालकांकडुन होत आहे.सर्व शिक्षा आभियान अंतर्गत मुलींना मोफत शिक्षण आहे. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून मानव विकास मिशनने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थींनीना शाळेत जाण्यासाठी मोफत बसची सुविधा दिली आहे. शहादा आगाराला यासाठी सात बस दिल्या आहेत. परंतु आगाराने काही मार्गात केलेली कपात, मुलींची वाढती संख्या व बस संख्या यात जाणवत असलेली तफावत पाहता काही मुलींच्या शिक्षणाला ब्रेक लागल्याचे लक्षात येते.एका बाजूला शासन साक्षरता वाढविण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे.

सात मार्ग निश्चित : शहादा आगारतून मानव विकास मिशन बस करीता सात मार्ग निश्चित केले आहेत. त्यात 1)-शहादा-खरगोण=लोणखेडा, कॉलेज, दरा फाट, ब्राम्हणपूरी, सुलतानपूर, मुबारकपूर, बहिरपूर. 2)-शहादा-कुरंगी=पुरूषोत्तम नगर, सावखेडा, कवळीद, भागापूर, टुकी, गोगापूर, दामळदा. 3)-शहादा-राणीपूर=लोणखेडा कॉलेज, दरा फाटा, नवलपूर. अ.जुनवणे, पिंपरी, म्हसावद, इस्लामपूर, लक्कडकोट.4)-शहादा-ओझर्टा=डोंगरगाव, सावखेडा, कमरावद, कर्जोत, पिंपर्डा, असलोद, मंदाणा. तितरीफाटा, जाम जावदा .5)-शहादा-कळंबु=मामामोहिदा, सोनवद, कवठळ. कहाटूळ, लोढरे. धांदरा, निभोरा, जयनगर. बोराळा. कुकावल. कळंबू. 6)-शहादा-कलमाडी=तिखोरा, कलसाडी, परिवर्धा, त-हाडी. ठेंगचा.7)-शहादा-लिंबर्डी=अलखेड, पाडळदा, औरंगपूर, कुढावद, भुतेआकसपूर आदी मार्ग आहेत. मात्र प्रकाशा, वैजाली, रामपूर आदी परीसरातील गावे वगळण्यात आली आहेत.विद्यार्थीनीची वाढती संख्या व रद्द केलेले वाहतूक मार्ग लक्षात घ्यावा, अशी पालकांची विनंती आहे.

प्रकाशा,वैजाली, दरा मार्गाच्या विद्यार्थीनी या योजनांपासून वंचीत
सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण द्यावे यासाठी मोफत बस पासची व्यवस्था केली आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनीसाठी अहिल्यादेवी तर अकरावी व बारावीच्या विद्यार्थींनीना मानव विकास मिशन योजने मार्फत मोफत पास दिले जातात माञ प्रकाशा,वैजाली, दरा मार्गाच्या विद्यार्थीनीना या योजनांपासून वंचीत आहेत.शहादा आगाराला मानव विकास मिशनअंतर्गत सात बस देण्यात आल्या आहेत.प्रती बस 120प्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या 840 विद्यार्थींनीना ही मोफत पास मिळतील.

मोफत पासपासून वंचीत
शहादा शहरात व्ही.के.शहा कनिष्ठ महाविद्यालय, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, शारदा कन्या कनिष्ठ विद्यालयात, व्हॉलेंटरी कनिष्ठ महाविद्यालय, म्युन्सीपल कनिष्ठ महाविद्यालय, लाडकोरबाई विद्यालयात, मिशन विद्यालयात आहेत. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणा-या अकरावी व बारावीच्या जवळपास 1000विद्यार्थीनी असतील. बस क्षमता व येणा-या विद्यार्थीनीची संख्या पहाता 200 च्या जवळपास विद्यार्थीनीना मोफत पासपासून वंचीत रहावे लागण्याची शक्यता आहे. याचा फटका गरीब विद्यार्थीनीना सहन करावा लागत आहे.