असलोद- नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील प्रकाशा रस्त्याजवळील शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी आश्रमशाळेचे अधीक्षक चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत तरुणीने शहादा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून भादंवि कलम 354, 354 (अ) 1 व बालकाचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण कलम 7, 8,व 9 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक प्रियदर्शनी थोरात या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.