शहादा। तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात अंतर्गत रस्त्याची कामे वेगाने सुरु असुन बाजार समितीचा चेहरा मोहराच बदलणार आहे. सत्ताधारी गटाचे नेते सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सभापती सुनिल पाटील, उपसभापती रविंद्र रावल, संचालक मंडळ व सचिव संजय चौधरी परीश्रम घेत आहेत. प्रवेशद्वारापासुन तर कार्यालयापर्यंत, स्टेट बँकेपासुन तर कार्यालय व्यापारी संकुलापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जात आह. नगरपालिका शाळेकडील असलेल्या मागील बाजुस संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरु आहे.
आवारात कुठेही घाणीचे साम्राज्य राहाणार नाही, याची काळजी या विकास कामाच्या माध्यमातून घेतली जात आहे. रस्त्याचे काम झाल्यावर कृउबाच्या कार्यालयाचा अद्ययावत इमारतीचे काम होणार आहे. या आधी गेल्या पाच महिन्यापूर्वी आवारात सर्वत्र पथदिवे लावण्यात आले आहे. त्यामुळे रात्री मोठ्या प्रमाणात आवारात उजेड राहतो. गेल्या एक वर्षापूर्वीच शेतकर्यांच्या धान्यासाठी भव्य शेड बांधण्यात आले होते, ज्यामुळे व्यापारी व शेतकर्यांची मोठी सोय झाली आहे.