शहादा च्या कराटेपटूंनी मिळवले यश 

नंदुरबार येथे झालेल्या कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत शहादा येथील ए. के.मार्शल आर्ट्स अकादमी च्या कराटे पटूंनी यश मिळवले .

जापान शोतोकान कराटे डोकनिकुज ऑर्गनाइजेशन ऑफ़ इंडिया यांच्या मान्यतेने यशवंत क्रीड़ा संकुल, नंदुरबार येथे दि. येलो बेल्ट ते ब्लैक बेल्ट ग्रेडेशन परीक्षा स्पोर्ट्स कराटे जिह्याचे सचिव डॉ.दिनेश बैसाणे यांनी आयोजित केली .

यात ऑरेंज बेल्टमध्ये खुशी सचिन कोचर, पर्णवी खगेंद्र कुंभार, कनिष्का नामदेव साळवे, विवान भूषण मोरे, ग्रीन बेल्ट मध्ये शार्दुल अमोल कदम, ब्लू बेल्ट मध्ये रिद्धी भूषण मोरे, वरद विष्णु गरकळ, प्रेम विशाल अहिरे, ब्राउन बेल्ट मध्ये गौरव खगेंद्र कुंभार यांनी यश संपादन केले .

या यशस्वी खेळाडूंना उपनगराध्यक्ष रविंद्र पवार व् कराटे संघटनेचे अध्यक्ष राजेश परदेशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व् ट्रॉफी देण्यात आली. बेल्ट ग्रेडेशन निरीक्षक म्हणून ओम सुर्यवंशी,चंदना लोढ़ा,कृष्णा बैसाने,हर्ष वळवी,नवदीप राजपूत यांनी काम पाहिले .

या यशस्वी खेळाडूंना कराटे प्रशिक्षक करण निकुंभे व् मुख्य प्रशिक्षक शुभम कर्मा यांचे मार्गदर्शन लाभले .