शहादा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अग्रवालांची फेरनिवड

0

सचिवपदी प्रा. कुवर तर उपाध्यक्षपदी घोडराज यांनाही पुन्हा संधी; राज्य संघटनेशी कायदेशीर संलग्नता घेणार

शहादा । शहादा तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल यांची तर सचिवपदी प्रा. नेत्रदीपक कुवर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शहादा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांची वार्षिक बैठक ज्येष्ठ पत्रकार प्रा. दत्ता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गत वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यात आला. नविन सभासद नोंदणी तसेच तालुका पत्रकार संघाची राज्य संघटनेशी संलग्नता करण्याविषयी निर्णय घेण्यात आला. येत्या वर्षात संघाच्यावतीने विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्याविषयी ठरविण्यात आले. संघाच्या धोरणानूसार वर्ष पूर्ण झाल्यामुळे नूतन कार्यकारिणी निवडीबाबत चर्चा करण्यात आली.

अशी आहे कार्यकारिणी
यावेळी नूतन कार्यकारिणीची निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल, सचिवपदी प्रा.नेत्रदीपक कुवर तर उपाध्यक्षपदी बापू घोडराज यांची पुनश्‍च निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी योगेश सावंत, सहसचिवपदी राजू कुलकर्णी तसेच कोषाध्यक्ष म्हणून चंद्रकांत शिवदे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांत राजमल जैन, सुधीर कुलकर्णी, हर्षल साळूंखे, विजय अग्रवाल तर पत्रकार संघाचे प्रवक्तेपदी हिरालाल रोकडे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.

यांची झाली नियुक्ती
संघाचे कायम निमंत्रित तथा सल्लागार म्हणून प्रा. दत्ता वाघ, प्रा. रविंद्र पंड्या, प्रा. डी.सी.पाटील, सुनिल सोमवंशी, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. राजेश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रा. वाघ, प्रा. पाटील, प्रा. पंड्या, श्री. सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले. तालुका पत्रकार संघात नवीन सभासदांना प्रवेश देण्यासाठी नियमावली तयार करण्याचे व त्यानूसार प्रवेश देण्याचे ठरविण्यात आले. तालुका पत्रकार संघाची नोंदणी राज्य संघटनेशी संलग्न करण्याचे अधिकारी अध्यक्षांना देण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. नेत्रदीपक कुवर यांनी तर आभार राजेंद्र अग्रवाल यांनी मानले.