शहादा तालुक्याचा 12 वीचा निकाल 91.17 टक्के

0

शहादा। काल 30 जून रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये तालुक्याचा निकाल 91.17 टक्के लागला. येथील कै.सौ.जी.एफ.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 94.77 टक्के लागला. त्यात विज्ञान विभागाचा 98.84, कला 79.50 तर वाणिज्य शाखेचा 97.43 एवढा लागला. पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, विज्ञान वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 94.73 टक्के लागला. महाविद्यालयातील 570 पैकी 540 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्रावीण्यासह 20, प्रथम श्रेणीत 278 तर द्वितीय श्रेणीत 238 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 98.05 टक्के लागला असून, कुणाल पटेल, वैशाली बाविस्कर, आकांक्षा पाटीलने अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला.

कला शाखेचा निकाल 88.37 टक्के लागला आहे. रवींद्र शिंदेने प्रथम, मयूरी दायमाने द्वितीय तर सुरेश शर्माने तृतीय क्रमांक मिळवला. एमसीव्हीसी शाखेचा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा निकाल अनुक्रमे 94.74 90 टक्के लागला. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीत निकेश पवारने प्रथम, यादव कुलकर्णीने द्वितीय तर गणेश कोळीने तृतीय क्रमांक मिळवला. इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी शाखेत दिनेश पाडवीने प्रथम, जयेश शिंदेने द्वितीय तर दिनेश महाजन रोषण साळुंखेने तृतीय क्रमाक मिळवला. विद्यार्थ्यांना पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, मानद सचिव कमल पाटील, प्राचार्य मकरंद पाटील, पी. आर. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, उपप्राचार्य प्रा.डी. सी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. व्ही. पी. येवले आदींचे मार्गदर्शन लाभले. शहादा येथील सर सय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 95.53 टक्के लागला. तन्वी बानो खान, शेख नमीराबी अन्सार, राहत अंजुम रफिक यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला. शारदा कन्या उच्च माध्य विद्यालय कला शाखेचा 84.93 टक्के लागला. तर वसंतराव उच्च माध्य. विद्यालयाचा निकाल 90.59 टक्के, विज्ञान शाखेचा निकाल 98.24 टक्के तर कला शाखेचा निकाल 77.92 टक्के एवढा लागला. विज्ञान शाखेतून मनोज वाडीले 81.36 प्रथम , सिरीनबानो अजीम 79.53 द्वितीय, प्रतीक पाटील 79.53, पंकज कोळी 78.76 तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कला शाखेतून सपना पाटील 74.15, वसावे ठाणसिंग 73007, साळुंखे कविता 72.61 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले.