शहादा तालुक्यातील नवागाव ते शहादा येथिल शाळकरी मुलीं साठी मानव विकास मिशन अंतर्गत एस.टी.बस त्वरित सुरू करण्याची मागणी

शहादा::–

शहादा तालुक्यातील नवागाव ते शहादा येथिल शाळकरी मुलीं साठी मानव विकास मिशन अंतर्गत एस.टी.बस त्वरित सुरू करण्याची मागणी शहादा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नवागावं परिसरातील चार गावांसह अनेक पाड्यावरील विद्यार्थिनींच्या वतीने महारष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगार प्रमुख व गटशिक्षण अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

तालुक्यातील नवागावं, कंन्साई, सातपिंप्री, लिंबर्डी व हया गावांच्यां परिसरातील पाड्यावरिल अनेक विद्यार्थींनी शहादा येथिल शाळा-महाविद्यालयात शिक्षणा साठी यावे लागते मात्र, एस.टी.बस नसल्यामुळे त्यांना मोठया प्रमाणावर हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात त्यासाठी शहादा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महारष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नंदुरबार जिल्हा अध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी नवागावं, कंन्साई, सातपिंप्री, लिंबर्डी या गावांच्यां शाळा- महाविद्यालयांत ये – जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनीना बस नसल्यामुळे मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो त्यामूळे त्यांना मोठया प्रमाणावर हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात हा सारा प्रकार बंद व्हावा म्हणून शहादा ते नवागावं एस.टी.बस त्वरित सुरू करावी म्हणून आज महारष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगार प्रमुख व गटशिक्षण अधिकारी, शहादा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर तालुका अध्यक्ष माधवराव पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कूवर, कैलास पावरा, प्रविण भोसले, जिल्हा सचिव संतोष पराडके, सुरेश पटले, सुरेश पावरा यांच्या सह मोठ्या संख्येने विध्यर्थिनीचे पालक, विद्यार्थ्नी , राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.