शहादा तालुक्यात प्रथमच आठही सिंचन प्रकल्प कोरडेठाक

0

शहादा। तालुक्यात प्रथमच या वर्षी मे महिन्यातच आठही सिंचनप्रकल्प कोरडे झाल्याने त्याच्या परिणाम शेतकर्‍यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात भोगावा लागला. तालुक्यात प्रथमच असे भयावह चित्र निर्माण झाले आहे. अक्षरश: सिंचन प्रकल्पामध्ये ठणठणात आहे. राणीपुर दुधखेडा खापरखेडा कोंढावळ लंगडी भवानी लोंढरे शहाणेसह चिरडे लंघुप्रकल्प तालुक्यात आहेत. यापैकी राणीपूर दुधखेडा व सुसरी हे मोठ्या सिंचन प्रकल्प आहेत.

धरणातील गाळ काढण्याची मागणी
दरवर्षी जून महीन्यापर्यंत राणीपुर, सुसरी, दुधखेडा धरणात काहीशा प्रमाणात जलसाठा शिल्लक रहात होता. पण पहिल्यांदा या तिन्ही प्रकल्पात पाण्याचा थेंब शील्लक नाही. परिणामी परिसरातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेकडो बोअर कोरडे पडले आहेत. म्हणून शहाद्या तालुक्यातील शेतकरी लवकर पावसाळा सुरु होईल या प्रतीक्षेत आहेत. दुधखेडा लोंढरे धरणला गळती लागळ्यामुळे पाण्याचा लवकर निचरा झाला. त्यांची दुरूस्ती न केल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे रहाण्याची शक्यता आहे. राणीपुर धरणात गाळ साचल्याने जलसाठ्याची क्षमता कमी झाली आहे. वास्तविकता लघुसिंचन पाटबंधारे विभागाने गाळ काढणे अपेक्षीत होते. एकमेव सुसरी धरणाच्या गाळ उपसला गेला. शेतकर्‍यांनी शेकडो ड्म्पर गाळ नेवून शेतात टाकला. सुसरी प्रकल्पात पहिल्यांदा पाण्याचा थेंब नाही हे विशेष.

सारंगखेडा बॅरेजचा जलसाठा कमी
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. पाहिजे तसे नद्यानाल्यांना वेळोवेळी पुर आले नव्हते. शेवटी सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस चांगला झाल्याने सिंचनप्रकल्प 60 ते 70 % भरले होते. पूर्णक्षमतेने पाण्याचा साठा नव्हता. परिणामी मे महिन्यातच सारे प्रकल्प कोरडे झाली आहेत. म्हणून यावर्षी पावसाळा चांगला होणे आवश्यक आहे. नद्यानाल्याना मोठे पुर येणे गरजेचे आहे. सुरुवातीला 10 ते 12 दिवस पावसाळ्यात सर्व सिंचन प्रकल्पात जमीनीत मोठ्या प्रमाणात पाणी जिरणार अशी परिस्थिती आहे. सारंगखेडा बॅरेजचे ही 8 मीटरने पाण्याचा जलसाठा कमी झाला आहे. प्रकाशा येथील बॅरेजच्या पाण्याचा फुगवटा डामरखेड्यापर्यंत रहात होता. यावर्षी तो गोमाई नदीच्या पुलापर्यंत सारंगखेडा पर्यंत न जाता तो शेल्टी गावापर्यंत आहे.