शहादा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचा निवडणूक प्रक्रीया सुरु आहे. तिन्ही ग्रामपंचायत मोठ्या आहेत म्हणुन राजकीय दृष्ट्या लक्ष लागले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार दि 11 सप्टेंबर पर्यंत होती. म्हसावद ,पाडळदा ,कळंबु ह्या तीन ग्रामपंचायत निवडणूका होत आहे. प्रथमच शासनाचा अध्यादेशामुळे जनतेतुन सरपंच निवडला जाणार आहे. तिन्ही ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसुचित जमातीसाठी राखीव असल्याने उपसरपंच पदाला जास्त महत्व आले आहे व तशी मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील,माजी जि.प. उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल , माजी जि.प. कृषी सभापती डॉ. भगवान पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जिप सदस्य अभिजीत पाटील सक्रीय झाले आहेत. या नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भविष्यात येणार्या जिल्हापरिषदनिवडणूकांचा पुर्वीची रंगीत तालीम म्हणून या निवडणूकांकडे पहाण्यात येत आहे. तालुक्यातील म्हसावद ग्रामपंचायत सर्वात मोठी आहे.
17 जागांसाठी 69अर्ज सरपंच जागेसाठी 5उमेदवारी अर्ज दाखल झालेत. 14 सप्टेंबर रोजी माघार होणार आहे. सर्वांचे लक्ष म्हसावद ग्रामपंचायत निवडणूकीकडे लागले आहे. सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील यांचे डॉ. भगवाल पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल भाजपाचे पॅनल अशी चार पॅनल रिंगणात रहातील. भाजपाची सत्ता शिवाय खासदार, आमदार, भाजपाचे असतांना आमदार उदेसिंग पाडवी, खा. हिना गावीत यांना ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे. अन्यथा त्यांचा नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. भगवान पाटील व मोतीलाल पाटील एकत्र येतात की डॉ. पाटील व दिपक पाटील एकत्र येतात याकडे लक्ष लागले आहे. म्हसावद ग्रापनिवडणुकीनंतर कळंबु, पाडळदा निवडणुका होणार असुन कळंबु ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी व भाजपा यांच्यात रस्सीखेच होइल. आतापर्यंत गेल्या 10 वर्षात ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीचा वर्चस्वाखाली होती. गेल्या पाच वर्षत कळंबु गावाचे राजकारण पूर्णतः बदलले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्थानिक राजकारणाला महत्व प्राप्त झाले आहे. तापीकाठावर बर्याच गावांमध्ये जयपालसिंग यांचे वर्चस्व आहे म्हणून ते कोणती खेळी खेळतात याकडे लक्ष लागले आहे. पाडळदा ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे मात्र येथील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चिन्ह आहेत. गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच होवून माणक सूर्यवंशी ह्यांचा नेतृत्वाखाली बिनविरोध होणार आहे. एकंदरीत तालुक्यातील सर्वात जास्त लक्षवेधी निवडणूक म्हसावद ग्रामपंचायतीची होणार आहे हे चित्रे स्पष्ट आहे. शहादा तालुक्यातील म्हसावद ग्रामपंचायत ही राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाते. सुमारे 9 हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असुन उमेदवारी अर्ज् दाखल करण्याचा शेवटचा दिवशी म्हणजे 11 रोजी महिला सरपंच जागेसाठी पाच तर 17 सदस्य जागेसाठी 69 अर्ज दाखल झाले आहेत.
शहादा तालुक्यातील म्हसावद ग्रामपंचायत ही शहादा तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत अशी आहे की थेट जनतेतुन सरपंचाची निवड होत आहे. एसटी महिला सरपंच जागा असल्याने पाच च उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात लिलु सुभाष बागले, मोगरा महेंद्र भिल , शर्मिला जगदेव वळवी , जयंताबाइ अब्बास भिल , अक्काबाई रमेश ठाकरे या महिलांचा समावेश आहे. माजी जिप सदस्य डॉ. भगवान पाटील व त्यांचे बंधु तथा विद्यमान उपसरपंच प्रकाश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य अंबालाल अशोक पाटील व प्रसिध्द व्यापारी किशोर बाबुलाल वेदमुथा ( चंदुशेठ) यांनी स्वतंत्र पॅनल उभे करुन 17 जागेसाठी 17 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविलेले आहेत. त्यामुळे निवडणूकीत चुरस पहावयास मिळणार असल्याचे चित्र असुन तिघ पॅनल प्रमुखांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. 14 सप्टेंबर रोजी माघारीचा दिवशी खरे चित्र स्पष्ट होणार आहे तर 26 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. या 74 उमेदवारांचे सहा वार्डामधुन निवडणूक होणार असुन 2971 पुरूष व 2836 स्रीया मतदार त्यांचे भवितव्य ठरविणार आहेत.
– भरत शर्मा, शहादा
9156293031