शहादा । येथील नगरपालीकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्ष ते खाली घेण्यात आली असुन सखोल चर्चेअंती 58 पैकी 4 विषयांना स्थगिती देवुन 54 विषयाना बहुमताने मंजुर करण्यात आले. विरोधक व सत्ताधार्यांमध्ये पहिल्यांदाच खडाजंगी न होता सभा शांततेने पार पडली. यावेळी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, उपनगराध्यक्ष ऱेखा चौधरी, आरोग्य सभापती शहरेनाज खान पठाण, नगरसेवक मकरंद पाटील, संदीप पाटील, प्रशांत निकम, आनंद पाटील, लक्षमण बढे, रविंद्र जमादार, वंदना जमदाळे, उषा कुवर, योगीता वाल्हे, रिमा पवार आदिसह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
घनकचरा ठेक्याला मुदतवाढ
यावेळी सर्वसाधारण सभेत 58 विषयाना सभागृहात मांडण्यात आले. मात्र विषय क्रमाक 7 प्रभाग क्र सहा जुना मोहीदा रोड डॉ. अमोल वैद्य यांचा रुग्णालय ते विश्राम गृह पर्यन्त नवीन गटार बांधकाम करणे विषय क्रमांक 18 चंदा वसंत डोडवे या सफाई कामगराला कामावर घेणे बाबत विचार विनिमय करणे विषय क्रमांक 33 घनकचरा ठेक्याला मुदत वाढ देणे व विशेष क्रमांक 49 सफाई कामगार राजु नथु वाघ याची स्वेछा निवृत्ती मंजूर करुन त्यांच्या वारसाना कामावर घेणे या चारही विषयाना सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेत नामंजुर करण्यात आले. सभेत मकरंद पाटील लक्ष्मण बढे, आनंदा पाटील, संदीप पाटील, योगीता वाल्हे यांनी चर्चेत भाग घेतला. सभागृहाचे लक्ष वेधत म्हणाले की बसस्थानकाजवळील खड्डा बुजविणे, शहरात सुरु असलेल्या ठेकेदारांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक नागरीकांचा तक्रारीसाठी उपलब्ध करुन संगणीकृत तक्रार निवारण कक्ष उभारने तसेच खुल्या गटारीवर जंतुनाशक फवारणी करणे आदि महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित करुन सदर नगरसेवकानी सभागृहाचे लक्ष वेधले.