शहादा नगरपालिकेच्या आगीचा आज पंचनामा

0

शहादा । येथील नगरपालिकेच्या तळमजल्यावर बुधवार 5 जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली, या आगीत साहित्य व कागद्पत्रासह एकुण 2 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला. सागर मदन साळुंके यांचा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचनाम्यात 1990 पासुन विविध रेकॉर्ड, सर्व साधारण सभांचे इतिवृत्त ठराव, जन्ममृत्युची नोंदणी फाइल, विवाह नोंदणी, आस्थापना विभाग कागदपत्रे, छतावरील पंखे, एक लॅपटॉप, एलइडी टी व्ही, लाकडी खुर्च्यांसह मुख्याधिकारी दालनाचा काचा फुटल्या आहेत. शिवाय अग्निशमन दलाने आग विझवतांना अनेक कागदपत्रे ओली झालीत. आगीचा धुराड्यामुळे सर्व भाग काळा झाला. आग विजेचा शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यानी पहाणी केली. सोबत मुख्याधिकारी डॉ सुधिर गवळी होते. ओल्या झालेल्या फाइली, कागदपत्रे नगराध्यक्ष दालनात ठेवण्यात आले आहेत.

नगराध्यक्ष पाटील यांनी केली पाहणी
आग विझविण्यासाठी नगरसेवक मकरंद पाटील, आनंदा पाटील, प्रशांत निकम, संजय साठे, जुनेद पठाण, माजी नगरसेवक संजय चौधरी, राकेश पाटील, भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाळे, माजी नगराध्यक्ष विजय पाटील यानी मेहनत घेतली. पालिकेचा इतिहासात पहिल्यांदाच आग लागल्याची घटना घडली. तपास ए. एस. आ बी. डी. शिंदे करीत आहेत.नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यानी घटनास्थळी पाहणी केली. ते रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील निवासस्थानी होतो. प्रकृती बरी नसल्याने नांदरखेडा येथे गेले होते. तर जि. प. सदस्य अभिजित पाटील हे मुंबई येथे गेले होते. आज मुंबई येथुन परत आल्यानंतर मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांचाशी चर्चा केली. पालीकेचे अधिकारी व कर्मचारी हजर झाल्याने मोठा अनर्थ टळला.