शहादा: शहादा पंचायत समितीत भाकपा तटस्थ राहिल्याने भाजपाचा सत्ता स्माथापनेचा मार्ग सुकर झाला आहे. आज १६ जानेवारी रोजी सभापती निवडणूकीत भाजपाच्या लोणखेडा गणातुन बिन विरोध निवड झालेल्या बायजाबाई भील यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी जावदे तबो गणातील रवींद्र रमाकांत पाटील यांनी अर्ज दाखल केले आहे. काँग्रेसकडून सभापतीपदासाठी रमणभाई शिवाजी पाटील , उपसभापती पदास्ठी शिवाजी पाटील यांनी अर्ज दाखल केले आहे. भाजपकडे १४ सदस्य संख्या असल्याने भाजपचा सभापती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कॉंग्रेसकडे १२ सदस्य आहेत.