शहादा । शहरासह परिसरात आज रोजी सकाळी आठ वाजेपासुन पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावल्याने पिकांना जिवदान मिळाले आहे. शेतकरी आनंदात झाला असुन गणरारायाचे आगमन पावसात झाले आहे. संततधार पावसामुळे विविध गणेशमंडळाची धावपळ उडाली असून आराससाठी चांगले शेड उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात शहादा तालुक्यातील सर्वात कमी पाऊस अद्याप पावेतो 49 % झाला आहे.
पावसाची आवश्यकता होती परंतु, पावसाने पाठ फिरविल्यांने शेतकरी चिंतातुर झाले होते. शहादा तालुक्यात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. अद्याप तालुक्यातील नद्या नाल्यांना मोठे पुर आलेले नाहीत. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण उन्हाळ्यात हजारो बोअरवेल कोरडे झाले आहेत. राणीपुरधरण वगळता सर्व सिंचन प्रकल्पमध्ये जलसाठा झालेला नाही अशी अवस्था आहे. आज सकाळपासुन पावसाने चांगली हजेरी लावली होती. कधी जोरदार तर कधी संततधार पाऊस झाला.