शहादा पालिकेचा 91.75 कोटीचा अर्थसंकल्प सादर

0

शहादा । पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 25 विषयांना पहिल्यांदा विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मंजूरी देण्यात आली. या सभेत 91 कोटी 75 लाखांचा अर्थसंकल्प सादर करन्यात आला असून यात 1 लाख 23 हजार 974 रुपयांचा शिलकी अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली. पालिकेच्या सभागृहात नागराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ, नगरसेवक प्राचार्र मकरंद पाटील, लक्ष्मण बढे, अखलाख अन्सारी, संगिता मंदिल, संगिता रोगेश चौधरी, उषाबाई कुवर, ज्योती नाईक, शमीम बी शे. हकीम, कु.रिमा पवार, वंदना जमदाळे, योगिता वाल्हे, रेखाबाई चौधरी, रविंद्र जमादार, आनंदा पाटील, प्रशांत निकम, संजर साठे, संदीप पाटील, इकबाल शेख, रियाज कुरेशी आदिंसह नगरसेवक, नगरसेवकांची उपस्थिती होती. रावेळी सभेत मंजूरीसाठी 25 विषय सादर करण्यात आले होते. यात विषय क्र. 5 नगरपालिकेच्या बिंदू नामावलीनूसार पदोन्नतीच्या रिक्त जागांवर योग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी यासाठी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.