शहादा । शहादा नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विषय समितीच्या सभापतींची निवड याप्रमाणे करण्यात आली. बांधकाम सभापतीपदी संगिता चौधरी, आरोग्य सभापती सय्यद सायराबी (एमआयएम), शिक्षण सभापतीपदी लक्ष्मण बढे, पाणी पुरवठा सभपतीपदी ज्योती नाईक, महिला बालकल्याण सभापतीपदी वर्षा जोहरी याप्रमाणे निवड करण्यात आली होती.निवड झालेल्या सभापतींचे विरोधी गटाच्या सदस्यांसह इतरांना शुभेच्छा देवून अभिनंदन केले तर निवड झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांना फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.